तरुण भारत

कोल्हापूर : इचलकरंजी, निमशिरगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

गोवा बनावटीचा सुमारे ७८ हजारांचा दारूसाठा जप्त

प्रतिनिधी / इचलकरंजी

Advertisements

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवाहर नगर (इचलकरंजी) व निमशिरगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकला. यात गोवा राज्य बनावटीच्या विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या कंपनीच्या ८२ बाटल्या, मोपेड दुचाकी असा ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रवीण जीवबा मांगले (रा. तिरंगा कॉलनी, कबनूर) व महेश अशोक कोगले (रा. निमशिरगाव, ता. शिरोळ) यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक राहुल गुरव, वर्षा पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एच. हजारे, जवान सुभाष कोले, विलास पवार, विजय माने, विशाल आळतेकर, प्रसन्नजीत कांबळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Stories

दहावी, बारावी परीक्षेबाबत संभ्रमावस्था

Abhijeet Shinde

वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची भीती

Abhijeet Shinde

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शहीद पोलिसांना केले अभिवादन

Abhijeet Shinde

कोवाड पूरस्थिती जैसे थे, दिवसभर पाऊसाची उघड झाप सुरुच

Abhijeet Shinde

आमदार राजेश पाटील विरोधी आघाडी समवेत; रात्री उशिरापर्यंत खलबते

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महापुरातील नुकसानग्रस्त मिळकतींचा निम्मा घरफाळा माफ करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!