तरुण भारत

रत्नागिरी : तालुकानिहाय सेवा वेतन पुस्तकांची होणार पडताळणी

जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुनिल मोरे यांचा उपक्रम
खेड शिक्षण विभागात कार्यवाही सुरू

प्रतिनिधी / खेड

जिल्ह्यातील पंचायत समितीच्या प्रत्येक शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांच्या व शिक्षण विभाग कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांची वेतन पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुनिल मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार असून येथील शिक्षण विभागात याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेतील शाळांतील निवृत्त शिक्षकांनी निवृत्तीनंतरची विविध देयके पदरात पाडण्यासाठी तसेच सेवा पुस्तकांच्या वेतन पडताळणीसाठी जिल्हा परिषदेमध्ये खेटे मारावे लागत होते. जिल्हा परिषद दरबारी सातत्याने उंबरठे झिजवून देखील सेवा पुस्तकांच्या वेतन पडताळणी प्रक्रियेस विलंब होत होता. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुनिल मोरे यांनी तालुकानिहाय सेवा पुस्तकांची वेतन पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनव उपक्रमामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुनिल मोरे व उपसभापती जीवन आंब्रे यांनी येथील शिक्षण विभागास भेट देत अधिकाऱ्यांसह शिक्षकांना मार्गदर्शन केले. या सेवा पुस्तकांच्या वेतन पडताळणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मुधोळे, मोरे, बेर्डे आदी येथे दाखल झाले आहेत. या प्रक्रियेस गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, प्रशासन अधिकारी पर्शुराम इचूर, सहाय्यक लेखाधिकारी हर्ष जाधव, हर्षल घाडगे यांचे सहकार्य लाभत आहे.

Related Stories

बीच सॅकमध्ये स्थानिकांना 30 टक्के प्राधान्य

Patil_p

जिल्हय़ात अकरावी प्रवेशाची वाट यंदा सुकर

NIKHIL_N

महामार्गावर खड्डे प्रवास ठरतोय धोकादायक

Patil_p

कशेडी चेकपोस्टवर विनापास ५० वाहनांना माघारी धाडले

triratna

रत्नागिरी शहर आय टी आय परिसरात बिबट्याचा वावर

Shankar_P

‘त्या’ कंटेनरची अंतर्गत मांडणी गुरे वाहतुकीसाठीच

Patil_p
error: Content is protected !!