तरुण भारत

कोडोलीत लोकमान्यचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

वारणानगर / प्रतिनिधी

लोकमान्य मल्टीपर्पज को – ऑप सोसायटीच्या कोडोली ता. पन्हाळा येथील शाखेचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला असून कोडोली शाखेने आठ कोटी रु. उद्दीष्ट पूर्ण केले आहे.

लोकमान्यचे संस्थापक चेअरमन व तरूण भारतचे समूह सल्लागार संपादक यांच्या मार्गदर्शनाखाली रौप्य महोत्सव पार केलेल्या सोसायटीने कोडोलीसह परिसरात ग्राहकाभिमुख सेवा देत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे. संस्थेचे प्रादेशीक व्यवस्थापक दिलीप पाटील, सहा. प्रादेशीक व्यवस्थापक राजाराम पाटील यांनी कोडोली शाखेस भेट देवून शुभेच्छा देत ग्राहकांशी संवाद साधला. कोडोलीसह परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर, ठेवीदार, ग्राहक यानी भेट देवून संस्थेस शुभेच्छा दिल्या.

कोडोली शाखेचे व्यवस्थापक मारूती पाटील, रविराज खिरुगडे, प्रमोद कदम, सत्यम कदम, अविनाश मोरे, संदीप साबळे यानी सर्व मान्यवरांचे स्वागत करून अभार मानले.

Related Stories

कोल्हापूरचा पारा @ 16

Abhijeet Shinde

पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रा रद्द

Abhijeet Shinde

यमगेतील पाण्याचे 24 पैकी 23 नमुने दूषित: गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 467

Abhijeet Shinde

सावरवाडी येथे वीज पडून राहत्या घराच्या भिंतीला तडे

Abhijeet Shinde

एमएलबी बेसबॉलमध्ये कोल्हापूरच्या वालावलकर ब्रेव्ह संघाचा झेंडा

Sumit Tambekar

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 325 वर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!