तरुण भारत

बार्शी व वैराग येथील जनावरांचे बाजार सुरु

प्रतिनिधी / वैराग

कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी येथील शनिवारचा जनावरांचा व शेळ्या मेंढ्या बाजार तसेच उपबाजार वैराग येथील बुधवार जनावरांचा व शेळ्या मेंढ्या बाजार चालू करण्यात येत असल्याचे बाजार समितीने जाहीर प्रसिद्धीकरण द्वारे कळविले आहे.

बाजार समितीने बार्शी शहर व तालुक्यातील शेतकरी व व्यापारी बांधवांना कळविले आहे की कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी मार्फत शनिवारी भरणारा बार्शीचा व उपबाजार वैराग येथील बुधवारी भरणारा जनावरांचा व शेळ्या मेंढ्या आठवडी बाजार सुरु करणेसाठी शासन आदेश परिशिष्ट क्र.२ महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई-४०००३२ यांचे आदेश क्र.डीएमयु/२०२०/सी.आर-९२/डीआयएसएम-१ दि.१४ ऑक्टोंबर २०२० या अन्वये मा.सोलापूर जिल्हाधिकारी यांनी दि.१५/१०/२०२० पासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील आठवडा बाजार ( जनावरांच्या बाजारासह ) सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

तरी शेतकरी व व्यापारी वर्गानी मास्कचा वापर करावा व शासन नियमांचे तंतोतंत पालन करुन वार शनिवार दि.१७/१०/२०२० पासून बार्शी येथील बाजार व वार बुधवार दि.२१/१०/२०२० पासून वैराग येथील जनावरांचा बाजार सुरु करण्यात येणार असून याची सर्व शेतकरी व व्यापारी बांधव यांनी नोंद घेण्याचे आवाहन बाजार समिती बार्शीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

उस्मानाबाद : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला

Abhijeet Shinde

आयशर टेम्पोच्या धडकेत महामार्ग पोलीस नाईक सागर चोबे यांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू

Abhijeet Shinde

सोलापूर : सोयाबीन रास करताना मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणाला माओवाद्यांचा पाठिंबा म्हणजे महाविकास आघाडीला धोक्याची घंटा

Abhijeet Shinde

अकलूज परिसरात तुफान पाऊस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!