तरुण भारत

मनपा करणार खुल्या जागांचे सर्वेक्षण

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिकेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात येतात. मात्र आजवर याची दखल गांभीर्याने घेण्यात आली नाही. पण आता महापालिकेच्या खुल्या जागांचे सर्व्हेक्षण करून तारेचे कुंपण घालण्याची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. शनिवारपासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisements

महापालिकेच्या मालकीच्या असंख्य खुल्या जागा आहेत. पण या जागांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही जागांचे बोगस कागदपत्र तयार करून हडप करण्यात आल्याचेही प्रकार घडले आहेत. प्रत्येक जागेभोवती तारेचे कुंपन घालुन महापालिकेने खुली जागा असे फलक लावले होते. पण सदर फलक गायब झाले असून, काही जागांचे संरक्षक कुंपन देखील हटविण्यात आले आहे. ठिकठिकाणी जागेच्या सभोवती अतिक्रमण करण्यात आल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहेत. खुल्या जागांवरील अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण याची दखल घेण्यात आली नाही. मात्र सदर खुल्या जागांची माहिती जमविण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे खुल्या जागांची माहिती घेण्यासाठी सर्व्हेक्षणाची मोहिम राबविण्यात येणार आहे. शनिवारपासून विविध विभागात ही मोहिम राबवून खुल्या जागांची माहिती घेण्यात येणार आहे.

Related Stories

जीएसएसच्या बीसीएतर्फे नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

Amit Kulkarni

हुतात्मा चौकात क्रांतीदिन साजरा

Amit Kulkarni

अंगणवाडी महिला कर्मचाऱयांचे आंदोलन

Amit Kulkarni

छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने

Amit Kulkarni

परिवहन कर्मचाऱयांचे निलंबन, बदली प्रक्रिया मागे

Amit Kulkarni

स्मार्ट रस्त्यावरच कचऱयाची समस्या

Patil_p
error: Content is protected !!