तरुण भारत

कार्तिकने नेतृत्व ‘सोडले’

मॉर्गन केकेआरचा नवा कर्णधार

फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी व सांघिक योगदान वाढवण्यासाठी आपण संघाचे नेतृत्व सोडू इच्छितो, असे दिनेश कार्तिकने केकेआर संघव्यवस्थापनाला कळवले असून त्यानंतर इयॉन मॉर्गन हा संघाचा नवा कर्णधार असेल, अशी घोषणा शुक्रवारी केली गेली. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी फ्रँचायझी वेबसाईटवरुन याबाबत माहिती दिली.

Advertisements

‘दिनेश कार्तिकसारखा कर्णधार लाभला, आघाडीचा खेळाडू लाभला, हे आम्ही केकेआर संघाचा सन्मान मानतो. असे खेळाडू संघाचे हित पाहणे अधिक पसंत करतात. नेतृत्वाची धुरा स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी उदारता लागते. आम्हाला त्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले. पण, आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करत आहोत’, असे म्हैसूर यांनी नमूद केले.

‘इंग्लंडला 2019 विश्वचषक जिंकून देणारा मॉर्गनसारखा दिग्गज कर्णधार केकेआरचे नेतृत्व साकारण्यासाठी सज्ज आहे. दिनेश कार्तिक कर्णधार असताना मॉर्गनने उपकर्णधारपद सांभाळत उत्तम योगदान दिले आणि आता उभयतांची जबाबदारी बदलत असताना ते अधिक प्रभावी ठरतील, अशी आमची अपेक्षा आहे’, याचाही म्हैसून यांनी उल्लेख केला.

यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात केवळ 108 धावा करता आल्या असून या पार्श्वभूमीवर त्याने नेतृत्व मॉर्गनकडे सोपवत फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. केकेआरला माजी न्यूझीलंड कर्णधार ब्रेन्डॉन मॅक्युलमचे प्रशिक्षण लाभत असून 4 विजय व 3 पराभव अशी त्यांची कामगिरी राहिली आहे.

Related Stories

विजयासह विंडीजची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत बरोबरी

Patil_p

इब्राहिमोव्हिक, लुकाकू यांना दंड

Patil_p

मर्यादित षटकांच्या मालिकेतून वॉर्नर बाहेर

Patil_p

पांघल, बिस्त, संजीत अंतिम फेरीत

Patil_p

कोरोना संक्रमित सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

जोआन लॅपोर्टो बार्सिलोनाचे नवे अध्यक्ष

Patil_p
error: Content is protected !!