तरुण भारत

हिंदूधर्मीय हे काफिर, तर ज्यू इस्लामचे शत्रू!

पाकिस्तानच्या शाळांमध्ये पहिल्याच धडय़ातील शिकवण, परधर्मद्वेषाचे बाळकडू शाळेतच

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisements

इस्लाम सोडून अन्य धर्मांसंबंधी पाकिस्तानमध्ये कोवळय़ा वयातच विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार केले जातात याचे प्रत्यंतर तेथील शालेय पाठय़पुस्तकातून येत आहे. हिंदू हे काफिर असून ज्यू हे इस्लामचे शत्रू आहेत, अशी शिकवण तेथील पाठय़पुस्तकांच्या प्रारंभीच्या धडय़ांपासूनच देण्यात येते, हे उघड झाले आहे.

ही शिकवण मदरशांमधील शाळांकडूनच नव्हे, तर अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱया पाक लष्करी शाळांमधूनही देण्यात येते, असा खुलासा बलुचिस्तानमधील   विचारवंत मुनिर मेंगल यांनी केला आहे. त्यांनी जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत गुरूवारी ते बोलत होते. इतकेच नव्हे, तर हिंदू आणि ज्यू हे मरण्याच्या लायकीचे आहेत, असेही संस्कार पाकमधील शालेय विद्यार्थ्यांवर पेले जातात असाही गौप्यस्फोट मुनीर मेंगल यांनी केला.

या कारणामुळे बंदुकांचा सन्मान

पाकिस्तानातील प्रत्येक सरकारी आणि खासगी शाळा, तसेच मदरसा येथे ही शिकवण प्रत्येक वर्गात आणि प्रत्येक टप्प्यावर दिली जाते, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. लष्करी शाळांमधूनही अशीच शिकवण दिली जात असल्याने पाक लष्करात हिंदुद्वैष्टय़ा सैनिकांचा भरणा आहे. ‘आम्ही बंदुकांचा सन्मान करतो, कारण या बंदुकांमुळेच आम्हाला हिंदू महिलांना ठार मारता येते. त्यांना मारले नाही, तर त्या हिंदू मुलांना जन्म देतील,’ अशी प्रक्षोभक भाषा हे सैनिक करतात, असेही मेंगल म्हणाले.

पाकिस्तानात इस्लाम सोडून इतर धर्मियांसंबंधी पराकोटीच्या द्वेषाची भावना प्राथमिक शाळांपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवली जाते, हे सत्य मेंगल यांनी त्यांच्या भाषणात उघड केले आहे.  

पुरोगामी कोठे आहेत ?

पाकिस्तानशी भारताचे मैत्रीचे संबंध असावेत, असा पुरोगाम्यांचा नेहमीचा घोषा असतो. पण ज्या पाकिस्तानात सरकारी पातळीवर आणि लष्करी शाळांमध्ये, हिंदू व इतर धर्मियांविरोधात अशा तऱहेचे शिक्षण शालेय पातळीपासून दिले जाते, त्या पाक सरकारवर विश्वास ठेवता येईल काय, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर पुरोगाम्यांकडून देले जात नाही. केवळ भारताकडून चांगुलपणाचे प्रदर्शन करून उपयोग नाही. पाकची मनोवृत्तीही बदलणे आवश्यक आहे, असे त्या देशाला ठणकावून सांगण्याचे धाडस आपले पुरोगामी कधी दाखाविणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Related Stories

जागतिक ‘एनजीओ’ दिवस का साजरा होतो

Amit Kulkarni

सीमा ओलांडल्यास होईल युद्ध

Patil_p

पेहरावातून समर्थन

Patil_p

दुबई एक्स्पोत 500 कोटींचा भारतीय पॅव्हेलियन

Patil_p

चीनला दणका; वंदे भारत रेल्वेगाड्या बनवण्याचे कंत्राट रद्द

datta jadhav

56 इस्लामिक देश, केवळ पाकिस्तान सोबत

Patil_p
error: Content is protected !!