तरुण भारत

डिचोली बायपास रस्त्यावरील दुभाजकांना ट्रकची धडक.

    डिचोली/प्रतिनिधी

   डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानकापर्यंत असलेल्या बायपास रस्त्याचे सध्या सुशोभिकरण सुरू असून रस्त्याच्या मधोमध बसविण्यात येत असलेल्या दुभाजकांवर काल शुक्र. दि. 17 ऑक्टो. रोजी सकाळीच एका ट्रकने मधोमध धड दिल्याने दुभाजकांची मोडतोड झाली सुदैवाने वाहनचालकाला व दोन्ही बाजुंनी ये जा करणाऱया वाहनांनाही कोणतीही झळ बसली नाही. मात्र या अपघातामुळे या बायपास रस्त्यावर राजरोसपणे होणाऱया अवजड वाहन पार्किंगचा मुद्दा कळीचा ठरला.

Advertisements

   डिचोली शहरातील सदर बायपास रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळे शहरातील मोठय़ा प्रमाणात अवजड आणि इतर प्रकारची वाहतूक कमी झाली आहे. त्याचा लाभ आंतरशहर फिरणारे लोक घेतात. सदर बायपास रस्ता सुशोभित करण्याच्या दृष्टीने डिचोलीत कार्यरत असलेल्या सेसा खाण कंपनीने काम हाती घेतले होते. मात्र खाणी बंद पडल्यावर सदर काम अर्धवटच स्थितीत सोडून कंपनीने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे अनेक वर्षे सदर बायपास रस्त्यावा बकाल स्वरूप प्राप्त झाले होते.

   सदर बायपास रस्त्याचे सुशोभिकरण करण्याचा ठराव डिचोली नगरपालिका मंडळाने घेतला आणि कामाला सुरूवातही केली. रस्ता पूर्णपणे रूंद करण्यात आला असून फुटपाथचे काम चालू आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध विभाजक बसविण्याचे काम सुरू असून सदर कामाला बसस्थानकापासून प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र सदर विभाजक पुढे गाडी असल्यास मागील वाहनचालकाला सदर विभाजकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात घडण्याची शक्मयता यापूर्वीच वर्तविण्यात आली होती. हल्लीच डिचोली गट काँग्रेसतर्फे बायपासवरील अवजड वाहन पार्किंग व इतर वाहतुक संदर्भातील विषयांवर डिचोली नगरपालिका आणि संबंधित अधिकाऱयांना निवेदन सादर केले होते.

   काल शुक्र. दि. 16 रोजी सकाळी एक जीए 03 डब्ल्यू 4916 या क्रमांकाचा मिनी ट्रक डिचोली पुलावरून बायपास रस्त्यावर येताच नव्यानेच उभारण्यात आलेल्या विभाजकांवर तो समोरून धडकला. त्यामुळे सदर विभाजकाची मोडतोड झाली. तसेच ट्रकचेही काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने आतील चालकाला मार बसला नाही. तसेच सदर ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा राहिल्याने वाहतुकीलाही व्यत्यय आला नाही.

   सदर बायपास रस्त्यावर दोन्ही बाजूंनी करण्यात येत असलेल्या अवजड वाहनांमुळे अनेकांना त्रास होतो. मात्र सदर बायपासच्या दोन्ही बाजू अवजड वाहनांसाठी पार्किंग म्हणून सरकारदरबारी अधिसुचित असल्याने सदर वाहने हटविण्यासाठी सक्ती करता येत नाही, असे नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी सांगितले. आता सदर बायपास रस्त्याचे सुशोभिकरण चालू असल्याने तसेच मधोमध विभाजक येणार असल्याने सदर रस्ता दोन्ही बाजूंनी खुला ठेवावा लागेल. त्यासाठी सदर अवजड वाहनांची अधिसूचना मागे घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. सदर फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात असून कोवीड महामारीमुळे सदर कामाला काही प्रमाणात विलंब लागला आहे. सदर अधिसूचना मागे घेण्यात आल्यानंतर या बायपास रस्त्यावर पार्किंग करण्यास मज्जाव केला जाणार आहे. सध्या पार्क करण्यात येणाऱया वाहनचालकांच्या मालकांना अनेकवेळा विनंती करूनही ते वाहने त्याच ठिकाणी पार्क करीत असल्याने अपघाताची शक्मयता उदभवत आहे. यापुढे अशा प्रकारचे अपघात घडल्यास या वाहनांच्या मालकांना जबाबदार धरले जाईल. असा इशारा नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी दिला आहे.

Related Stories

मेस्तावाडा वास्कोत घरावर माड कोसळून हानी

Amit Kulkarni

विरोधी पक्षनेत्यांनी घेतली कोरोना विरोधी लस

Amit Kulkarni

वास्कोत आयपीएल सट्टाबाज टोळी जेरबंद

Amit Kulkarni

पर्वरी पोलीस वसाहतीतील जून्या इमारती मोडकळीस

Patil_p

पर्रीकरांनी आजची कविडस्थिती योग्यरीत्या हाताळली असती- किरण कांदोळकर

Omkar B

रिव्होल्युशनरी गोवन्सच्या प्रमुखाला पेडणेतून आव्हान

Omkar B
error: Content is protected !!