तरुण भारत

जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत 94 व्या क्रमांकावर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

जागतिक कुपोषण निर्देशांकात 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर आहे. भारतासाठी ही परिस्थिती गंभीर आहे. जागतिक कुपोषण निर्देशांक अहवाल 2020 मधून ही बाब समोर आली आहे. 

पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेतील कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कमी वजन, बालमृत्यूदर या सर्व बाबींचा आढावा घेऊन ही आकडेवारी काढली जाते. नुकताच ‘वेल्ट हंगर हिल्फी’ ही जर्मन संस्था आणि ‘कन्सर्न वर्ल्डवाईड’ या आयरिश संस्थेने 2020 चा जागतिक कुपोषण निर्देशांक अहवाल सादर केला. त्यानुसार 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतासाठी ही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. 

देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते 100 असे गुण दिले जातात. भारताला 50 पैकी 27.2 गुण देण्यात आले आहेत. हे गुण देशाची परिस्थिती गंभीर असल्याची असल्याचे दर्शवतात. जागतिक कुपोषण निर्देशांक यादीत 2019 मध्ये भारत 102 व्या क्रमांकावर होता.

Related Stories

लॉकडाऊनचा फटका इस्रोलाही; 10 महत्वकांक्षी प्रकल्प रखडले

datta jadhav

गरिबांसाठी 65 हजार कोटींची गरज : रघुराम राजन

pradnya p

5 वर्षीय चिमुरडय़ाचा दिल्ली-बेंगळूर एकटय़ानेच प्रवास

Patil_p

चारधाम यात्रा आणखीन सुखकर

Patil_p

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र

pradnya p

सायना नेहवालने केला भाजपमध्ये प्रवेश

prashant_c
error: Content is protected !!