तरुण भारत

उत्तरप्रदेश पोलिसात 20 टक्के मुलींची भरती होणार

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

महिला, मुली आणि मुलांच्या सुरक्षेसाठी ‘मिशन शक्ती’ अभियान राबविण्यात येत आहे. यापुढे अत्याचारी नराधमांची सुटका होणार नाही. त्यांचे पोस्टर शहरातील चौकाचौकात लागतील. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी यापुढे उत्तरप्रदेश पोलिसात 20 टक्के मुलींची भरती होईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

उत्तरप्रदेशातील बलरामपूर पोलीस लाईनमध्ये योगी आदित्यनाथ यांनी ‘मिशन शक्ती’ अभियानाचे उद्घाटन केले. हे अभियान 24 सरकारी विभाग, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सामाजिक संस्थांना जोडणार आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. त्यानंतर एप्रिलपर्यंत दर महिन्याला एक आठवडा ही मोहीम राबवली जाईल. ज्यासाठी तारीखवार योजना निश्चित करण्यात आली आहे.

महिला, मुली आणि मुलांच्या सुरक्षा, प्रतिष्ठा आणि स्वावलंबनाच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकारने सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे.

Related Stories

राजस्थानमध्ये एका दिवसात 145 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 7173 वर

omkar B

दिल्लीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,29,531वर 

pradnya p

बिहार निवडणुकीत ‘टूथ पिक’ द्वारे दाबले जाणार ईव्हीएम बटण

pradnya p

ढगाळ वातावरणाचा विमानसेवेला फटका

omkar B

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले लॉक डाऊन वाढवण्याचे संकेत

prashant_c

चोवीस तासात देशात 27 हजार नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!