तरुण भारत

पुणे विभागातील 4 लाख 30 हजार 556 रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 4 लाख 30 हजार 556 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 83 हजार 253 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 39  हजार 544 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 89. 10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 12 हजार 699 रुग्णांपैकी 2 लाख 82 हजार 675 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 22 हजार 759 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे तर  बरे  होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  90.40 टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 94 हजार 103 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 83 हजार 253 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित 93 रुग्ण : एका दिवसात १५ रुग्ण वाढले

triratna

पुणे विभागात 10 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त

pradnya p

दुबार संसर्गाचा धोका बळावला

triratna

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावरच रेडीरेकनरचे नवे दर

tarunbharat

महाराष्ट्रातुन ७ लाख ३८हजार परप्रांतीय, कामगार स्वगृही परतले – गृहमंत्री अनिल देशमुख

Rohan_P

ॲड. आव्हाड हे टिळक आणि गांधींच्या वारशाचे पाईक

pradnya p
error: Content is protected !!