तरुण भारत

सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या 24 विशेष गाड्या धावणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या 12 विशेष रेल्वेजोड्या (24 गाड्या) धावणार आहेत. या गाड्यांच्या एकूण 156 फेऱ्या असतील. पश्चिम रेल्वेने यासंदर्भात ट्विट केले आहे. 

Advertisements

सणासाठी सोडण्यात येणाऱ्या या विशेष ट्रेन पूर्णपणे आरक्षित असतील. आजपासून (दि.17) 22 ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांना या ट्रेनचे बुकिंग करावे लागणार आहे. या विशेष गाड्यांचे भाडेही विशेष असणार आहे. 

12 जोड्या विशेष रेल्वेगाड्यांपैकी 5 जोड्या वांद्रे टर्मिनसहून, 2-2 जोड्या इंदूर आणि उधनाहून धावणार आहेत. तर प्रत्येकी 1-1जोडी ओखा, पोरबंदर आणि गांधीधाम स्टेशनहूनधावणार आहे. 

Related Stories

गुजरात : भीषण आगीत 25 वाहने जळून खाक

datta jadhav

सैनिकाच्या स्वागतासाठी ‘पसरले’ हात

Patil_p

एस.पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण

Patil_p

गर्भपातासाठी 24 आठवडय़ापर्यंत मुदतवाढ

Patil_p

समान नागरी कायदा आवश्यकच!

Patil_p

देशात 1.41 लाख बाधित रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!