तरुण भारत

रत्नागिरी : घरबसल्या युट्यूबव्दारे सोळजाईचे दर्शन

देवरुखच्या कलाकारांकडून देवीच्या महिमा गीताची निर्मिती
घटनस्थापनेचे औचित्य साधून लोकार्पण सोहळा, भाविकांमध्ये जयघोष


वार्ताहर / ताम्हाने

‘सप्तलिंगीच्या घाटात, आदिशक्तीच्या थाटात आहे. देवरुख गावची आई, ग्रामदेवी सोळजाई’ असा महिमा गीताच्या माध्यमातून भाविकांच्या कानी पडला आणि सोळजाई देवीचा एकच जयघोष सुरु झाला. शनिवारी घटनस्थापनेला दुपारी 2 वाजता दिमाखात देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाईच्या या महिमा गीताचा लोकार्पण सोहळा पार पडला. नवरात्रोत्सवात देवीचे मंदिर बंद ठेवले असल्याने भाविकांनी या गीताच्या माध्यमातुन युट्यूबवर देवी सोळजाईचे घरबसल्या दर्शन घेतले.

श्री देवी सोळजाईची महिमा सांगणाऱ्या गीताबाबत भाविकांमध्ये खुप उत्सुकता होती. घटस्थापनेचे औचित्य साधून अखेर हे गीत शनिवारी दुपारी दोन वाजता दिमाखात भाविकांसमोर आले आणि भाविकांनी सोळजाई देवीचा एकच गजर केला. नवरात्रोत्सवात देवीचे मंदिर बंद ठेवले असल्याने भाविकांनी या गीताच्या माध्यमातुन देवी सोळजाईचे घरबसल्या दर्शन घेतले. मंदिरात प्रहर सप्ताहाचा शुभारंभ झाल्यावर मंदिराबाहेर या गीताचे पोस्टर प्रसिद्ध करुन हे गीत लोकार्पण करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष बापु गांधी व कमिटी सदस्य, कारखानदार कुमकर, भाविक तसेच दिपक पवार, समीर महाडीक, प्रभाकर डाउल, सुमित मालप, निधी सार्दळ, प्रमोद हर्डीकर आदी उपस्थित होते. या गीतासाठी दिपक पवार, समीर महाडीक, प्रभाकर डाउल, विशाल मोहिते, सुमित मालप, गणेश खामकर, गीत माने. बाबु मोरे, प्रणीत मालप, सुमित मालप, शशी बांद्रे, आकाश नार्वेकर, प्रमोद हर्डीकर, निधी सार्दळ व सोळजाई देवस्थानचे सहकार्य लाभले. सोळजाई देवीचे हे गीत भाविकांना समाधान देणारे ठरले आहे. युट्युबवर ‘देवरुखचे कलाकार’ या साईटवर ते पहाता येणार आहे.

Related Stories

मोहल्ला सील करण्यावरून दाभोळमध्ये महिला आक्रमक

Patil_p

बेपत्ता गतिमंद मुलाची झाली आईसोबत भेट

NIKHIL_N

कोव्हीड वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

Patil_p

महामार्गाची ‘चाळण’ तरीही यावर्षी ना आंदोलने ना बोंब!

Patil_p

मिरकरवाडा बंदरात 44 अनधिकृत नौका

Patil_p

रत्नागिरीत सायंकाळनंतर जोर‘धार’

Patil_p
error: Content is protected !!