तरुण भारत

जळगाव हत्याकांड : गृहमंत्र्यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

  • कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आश्वासन 


ऑनलाईन टीम / जळगाव : 


जळगाव जिल्ह्यातील रावेरे येथे एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने संपूर्ण जळगाव हादरले आहे. दरम्यान, हत्या झालेल्या भावंडांच्या कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भेट घेत सांत्वन केले. 

यावेळी गृहमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना घरकुल जमीन आणि आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच राज्य शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांना दिला. सदर हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत, असेही सांगितले. 


पुढे ते म्हणाले, पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच या प्रकरणाची जबाबदारी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या प्रकरणात जलदगतीने कारवाई करण्याची सुचना स्थानिक पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. 

Related Stories

नागरिक मोठया संख्येने पडले घराबाहेर

Patil_p

सातारच्या ’घोडा’ चित्रपटाचा स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मान

Patil_p

स्कूल बस सुरु होईपर्यत करमाफी मिळावी !

Patil_p

कराडमध्ये एकाच दिवसात 5 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

Shankar_P

‘हे’ तीन पत्रकार आहेत मागील दोन महिन्यांपासून गायब

prashant_c

कोल्हापूर : रुईत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

Shankar_P
error: Content is protected !!