तरुण भारत

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणीसाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील गावांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, रामपूर, बोरी उमरगे या पूरग्रस्त गावानां मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,
दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,
दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,
दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,
दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

Related Stories

सांगली : खरसुंडीत विद्युत मोटारी चोरणार्‍या दोघा चोरट्यांना अटक

triratna

भाजपतर्फे मोफत घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती शिबीर

triratna

सातारा : वाठार (किरोली) येथे आणखी एक कोरोनाबाधित, एकूण संख्या ५९ वर

triratna

भुकेने मरण्यापेक्षा घरी जाऊन मेलो तर कुटुंबाला दर्शन होईल

triratna

कोल्हापूर : सुतगिरणी आधिकार्‍याचा अचानक मृत्यू, स्वॅब तपासणीच्या अहवालाची प्रतिक्षा

triratna

कोल्हापुर ते मुझफ्फरपुर साप्ताहिक किसान रेल धावणार

triratna
error: Content is protected !!