तरुण भारत

महाविकास आघाडीत एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जाणार नाही – उपमुख्यमंत्री

अजित पवार यांचे महेश कोठे, तौफिक शेख यांच्या पक्ष प्रवेशाबाबत सुचक वक्तव्य

प्रतिनिधी / सोलापूर

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार नाही. महाविकास आघाडीत एकमेकांचे कार्यकर्ते अजिबात फोडले जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. त्यामूळे महेश कोठे व तौफिक शेख यांचा पक्ष प्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर शहर-जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापुरच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेतून महेश कोठे व एमआयएमचे तौफिकक शेख सह इतर सात नगरसेवक हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार नाही. ते तारतम्य पाळले जावे’ असे म्हणत पक्ष प्रवेश होणार नसल्याचे सांगितले.

Related Stories

दुर्गम बामणोली विभागात आरोग्य सुविधा प्राधान्याने द्या

Patil_p

जगाच्या पोशिंद्याची जिल्हाधिकार्‍यांच्या हाकेला साद

triratna

कोल्हापूर महापालिका घरफाळा प्रकरणातील संशयितांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

triratna

मिरजेत चालत्या बुलेरो गाडीने घेतला पेट

Shankar_P

कडेगाव : नेर्लीतील कोरोनाबाधिताचा मृत्यू

triratna

कोल्हापूर : ‘दक्षिण’ मध्ये रविवारी ५ हजार झाडे लावणार

triratna
error: Content is protected !!