तरुण भारत

पदवीपूर्व महाविद्यालयांना 10 दिवस दसरा सुटी जाहीर

प्राचार्य-प्राध्यापकांना 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान मिळणार सुटी

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या संकटछायेतही बदलत्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करत महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयीन परिसर गजबजला नसला तरी महाविद्यालये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून सुरू होऊन दीड-दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. पदवीपूर्व खात्याने आता ऑनलाईन शिक्षणाला ब्रेक देऊन 10 दिवसांची दसरा सुटी जाहीर केली आहे. यामुळे ऑनडय़ुटी असणाऱया प्राचार्य-प्राध्यापकांना दि. 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान सुटी मिळणार आहे.

दरवर्षी महाविद्यालयांना दसऱयाची 20 दिवसांची सुटी दिली जाते. तत्पूर्वी सहामाही परीक्षा घेण्यात येतात. मात्र, यंदा महाविद्यालयांचे वेळापत्रक बदलले असल्याने प्रत्यक्षात मे महिन्यात सुरू होणारी महाविद्यालये जुलै-ऑगस्टमध्ये सुरू झाली आहेत. यामुळे सुटी देण्यात येणार नव्हती. मात्र, प्राध्यापकांच्या मागणीचा विचार करत 10 दिवसांची सुटी देण्यात आली आहे.

Related Stories

सुरेश अंगडी यांचे दिल्लीत स्मारक निर्माण करा

Omkar B

भाजी मार्केटमध्ये नियमांचा अभाव नागरिकांच्या आरोग्याला धोका

Patil_p

महाराष्ट्रातून येणाऱयांसाठीच संस्थात्मक क्वारंटाईन

Patil_p

महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे भाडेतत्वावर देण्यास आक्षेप

Patil_p

पडलवाडीनजीकच्या जंगलात वाळू तस्करीला ऊत

Omkar B

चंद्रकांत बांडगी यांची अध्यक्षपदी फेरनिवड

Patil_p
error: Content is protected !!