तरुण भारत

देवी शारदे कोरोना हद्दपार कर!

शारदोत्सव कार्यकारिणीने घातले गाऱहाणे

प्रतिनिधी/ बेळगाव

तमाम बेळगावकर महिलांच्या लाडक्मया जिव्हाळय़ाच्या शारदोत्सवावर कोरोनाने मर्यादा घातल्या. तथापि, गेली 49 वर्षे सुरू असलेली परंपरा अखंड ठेवण्यासाठी शारदोत्सव महिला सोसायटीने घटस्थापनेदिवशी शारदेची विधिवत पूजा करून कोरोना हद्दपार होण्यासाठी गाऱहाणे घातले.

नवरात्रीतील पहिले पाच दिवस शारदोत्सव सोसायटी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करते. यंदाचे तर शारदोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, त्यामुळे सोसायटीने वर्षभर कार्यक्रम करण्याची रुपरेषा आखली. नियोजन सुरू केले. परंतु कोरोनाने सार्वजनिक सोहळय़ावर नियंत्रण आणले. त्यामुळे कार्यकारिणीवरही मर्यादा आली.

तथापि, नवरात्रीच्या पहिल्यादिवशी म्हणजेच शनिवारी दुपारी शारदेची पूजा केली. गणेशबाग येथे हा कार्यक्रम झाला. प्रारंभी संजीवनी खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शारदोत्सवाच्या माजी संचालिका मंदाकिनी देसाई, देवयानी देशपांडे, ललीत मुतकेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या तिघींनी शारदोत्सवासाठी बहुमोल योगदान दिले आहे, असे निर्मला कळ्ळीमनी यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे मंथनच्या माजी अध्यक्षा संपदा जोशी, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, माजी आमदार बी. आय. पाटील, अभियंते सदाशिव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल तसेच दिवंगत कलाकार, राज्यकर्ते, साहित्यिक या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना अध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग म्हणाल्या, सर्वप्रथम कोरोना विरोधात लढणारे डॉक्टर, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी, पोलीस, बँक कर्मचारी, औषध विपेते व पत्रकार या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुवर्णमहोत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे ठरवून कार्यकारिणी व महिला कामाला लागल्या होत्या. मात्र कोरोनाचे संकट उद्भले. परंतु पुढील वषी हा उत्सव तितक्मयाच उत्साहात साजरा केला जाईल.

यावेळी पुरोहित आदित्य यांनी पूजा केली. कार्यकारिणीने देखील स्तवन सादर केले. माधवी बापट यांनी आभार मानले. यावेळी मेधा देशपांडे, कीर्ती दोड्डण्णावर, संजीवनी खंडागळे, निर्मला कळ्ळीमनी, माधवी बापट, संचालिका शोभा लोकूर, आशा कुलकर्णी, बींबा नाडकर्णी उपस्थित होत्या.

देवी शारदेचे दर्शन महिलांना घेता येणार आहे. महिलांनी 5.30 ते 7 यावेळेत बी-201, गणेशबाग मराठा मंदिर येथे माधुरी शानभाग यांना पूर्वसूचना देऊन यावे. कोविडचे नियम पाळणे बंधनकारक आहे, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

कोविड-19 मध्ये डोळय़ांची काळजी घेणे महत्त्वाचे

Patil_p

विजेचे बिल भरताना सोशल डिस्टान्सिंगचा फज्जा

Patil_p

सदाशिवनगर येथे गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

Rohan_P

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाला मिळणार गती

Patil_p

गावठी दारु विकणाऱया महिलेला अटक

Rohan_P

मराठा, करिअप्पा, एस. व्ही. कॉलनीत लसीचे वितरण

Patil_p
error: Content is protected !!