तरुण भारत

सुळगा (हिं) सिमेदेव मैदानाची पीडिओंनी तातडीने केली पाहणी

तरूण भारत वृत्ताची दखल, तातडीने समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

सुळगा (हिं) येथील दुर्लक्षित व दुरवस्था झालेल्या सिमेदेव मैदानावरील खड्डे नवज्योत क्रिकेट कार्यकर्त्यांनी श्रमदानातून बुजवताच पीडीओ पुनम गाडगे यांना जाग आली असून त्यांनी तातडीने मैदानाला भेट देऊन समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.    

गावापासून साधारण 1 किलो मीटर अंतरावर असलेल्या सिमेदेव मैदानात जागो-जागी खड्डे पडून दुर्दशा झाली होती. त्यामुळे मुलांना खेळणे जिकरीचे झाले होते. तसेच जागो-जागी पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले होते त्यामुळे मुलांना खेळताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत गावातील नवज्योत क्रिकेट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानावरील खड्डे श्रमदानातून बुजविल्याचे वृत्त तरूण भारत वृत्तपत्रात प्रसिध्द होताच पीडीओ पुनम गाडगे यांनी तातडीने मैदानाला भेट देऊन पाहणी केली. आणि येथील समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

  कार्यकर्त्यांनी श्रमदानातून थोडय़ा फार प्रमाणात खड्डे बुजवून मैदान सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप मैदानाचे सपाटीकरण करून सुविधा पुरविणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. तसेच मैदानात इतर सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. यावेळी माजी ग्रा. पं. सदस्य भागाण्णा नरोटी, देवकिरण चौगुले, नंदकिशोर पाटील, यल्लाप्पा अनगोळकर, शिवाजी चौगुले, यल्लाप्पा पाटील, मारूती पाटील, प्रकाश पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

‘ज्ञान प्रबोधन’मध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Patil_p

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त सायकल रॅली

Amit Kulkarni

आम्ही छत्रपती शिवरायांचे वारस, विसरू नका !

Abhijeet Shinde

कित्तूर उत्सवाचे थाटात उद्घाटन

Patil_p

दूध विक्रेत्यांना पोलिसांचा त्रास

tarunbharat

हिडकल जलाशयात 43 टीएमसी पाणीसाठा

Patil_p
error: Content is protected !!