तरुण भारत

बिहार : भाजप उमेदवाराच्या भावाच्या घरातून 22 किलो सोने, 2 किलो चांदी जप्त

ऑनलाईन टीम / पटना : 

बिहारमधील रक्सौल मतदार संघातील भाजपचे उमेदवार प्रमोदकुमार सिन्हा यांच्या भावाच्या घरातून 22 किलो सोने आणि 2 किलो चांदी नेपाळ पोलिसांनी जप्त केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोदकुमार सिन्हा यांचे भाऊ अशोक सिन्हा रक्सौलच्या शेजारी असलेल्या परसा जिल्ह्यात राहतात. प्रमोदकुमार यांनी 3 कोटी रुपये देऊन भाजपची उमेदवारी मिळवल्याची चर्चा होती. नेपाळी व्यापारी त्यांना पैसे पुरवत असल्याची चर्चा होती. त्यामुळे नेपाळ पोलिसांनी नेपाळमधील त्यांचे भाऊ अशोक यांच्या रेशीमकोठीस्थित गणेश अपार्टमेंटमधील घरावर गुप्तपणे छापेमारी केली. छापेमारी दरम्यान अशोक यांचे घर बंद होते. पोलिसांनी दरवाजाचे लॉक तोडून छापेमारी केली.

या छापेमारीत पोलिसांना 22 किलो 576 ग्रॅम सोन्याची बिस्किटे, दागिने आणि 2 किलो 263 ग्रॅम चांदी आढळून आली. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला आहे. 

Related Stories

छत्तीसगड : रायपूरमध्ये 22 ते 28 जुलै पुन्हा लॉक डाऊन

pradnya p

सौरव गांगुलीकडून गरजूंना 50 लाख रुपयांचे तांदूळ

tarunbharat

ज्येष्ठ शिवसैनिकास कोरोनाची बाधा; शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील

pradnya p

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास परवानगी

pradnya p

गुजरातमध्ये 176 कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

राफेल लढाऊ विमानं उद्या हवाई दलात सामील होणार

datta jadhav
error: Content is protected !!