तरुण भारत

धारकऱयांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौडला प्रारंभ

प्रशासनाच्या नियमावलीनुसार दौड : अवघ्या 6 धारकऱयांचा सहभाग

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित ‘दुर्गामाता दौडला’ शनिवारपासून प्रारंभ झाला. कोरोनाच्या काळातही परंपरा खंडित होवू नये यासाठी अवघ्या 6 धारकऱयांनी या दौडमध्ये सहभाग घेतला. आई भवानीचा जागर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार यावषी दौड काढण्यात येत आहे.

पहिल्या दिवशीच्या दौडला शहापूर येथील छत्रपती उद्यानापासून सुरुवात झाली. छत्रे गुरुजींच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पेरणामंत्राने पहिल्या दिवशीच्या दौडला सुरुवात झाली. यावेळी तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, विशाल चौगुले, मोहन ओक, विजय कुंटे, शंकरदादा भातकांडे, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

शिवप्रभू दौडमधील सहभागींना मिळाला मान

मोहिमेदरम्यान होणाऱया शिवप्रभू घेण्यात येत असते. यामध्ये सहभागी हो न विजेत्या धरलेल्या धारकऱयांना यावषी ध्वज व शस्त्र घेण्याचा मान मिळाला. यामध्ये सलग दोन वर्षे शिवप्रभू दौडचा विजेता ठरलेला सचिन बाळेकुंद्री, बसवंत पाटील, यल्लाप्पा मरूचे, राहुल लाड, प्रदीप जुवेकर, प्रशांत कलखांबकर असे 6 जण या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात दौडची सांगता झाली. खडेबाजार पोलीस स्थानकाचे सीपीआय धीरज शिंदे यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येमंत्राने पहिल्या दिवशीच्या दौडची सांगता झाली. यावेळी शहर प्रमुख अजित जाधव, विभाग प्रमुख अनंत चौगुले यांसह धारकरी उपस्थित होते.

छत्रेवाडा येथे शिवचरित्र पारायण

यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाने भव्य दुर्गामाता दौड काढण्यास परवानगी नाकारली. यामुळे ज्या धारकऱयांना दौडमध्ये सहभागी होता आले नाही, त्यांच्यासाठी विभाग स्तरावर शिवचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रेवाडा येथे सकाळी 6 ते 7 यावेळेत शिवचरित्राचे वाचन करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, अंकुश केसरकर, गजानन निलजकर, अर्जुन केसरकर, शुभम मोरे, अमर खणगावकर, औंकार पुजारी आदी उपस्थित होते.

सोमनाथ मंदिर येथे शिवचरित्राचे वाचन

ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरात शिवचरित्राचे वाचन करण्यात आले. धारकऱयांवर शिवचरित्राचे संस्कार व्हावेत, यासाठी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी गजानन पवार, अनंत चौगुले, प्रमोद चौगुले, गौतमी पवार, वैष्णवी धामणेकर, अंकिता तुळसकर, प्रियांका पावशे, पूजा राजहंस, पूजा लाड, श्रुती धारपवार, शीतल, आदिती, ऋतुजा आदी उपस्थित होते.

सोमवार दि. 20 रोजीचा दौडचा मार्ग…

नेहरुनगर येथील बसवाण्णा मंदिरपासून सोमवारच्या दौडला प्रारंभ होणार आहे. त्यांनतर दुसरा क्रॉसमार्गे, रामदेव हॉटेल चौक, शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर येथे दौडची सांगता होणार आहे.

Related Stories

महाराष्ट्र-कर्नाटकाला जोडणारी चन्नम्मा एक्स्प्रेस झाली पंचवीशीची

Patil_p

शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात कमळातील राजेशाही थाटातील महापूजा

Patil_p

शास्त्रीनगर येथील वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू

Rohan_P

विद्यार्थ्यांना घरपोच पाठयपुस्तके द्या : आपची मागणी

triratna

शहापूर येथील तरुणावर हल्ला वादावादीनंतर घडला प्रकार

omkar B

संकेश्वरात 183 किलो प्लास्टिक जप्त

Patil_p
error: Content is protected !!