तरुण भारत

भाजी बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढतेच

प्रतिनिधी/ बेळगाव

 बेळगावच्या भाजी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढतच आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनपासून सुरू झालेली भाजीपाल्याची महागाई अजूनही बाजारात अनुभवायला मिळत आहे. शनिवारच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली व दर वाढले असेच चित्र अनुभवायला मिळाले. कोरोनाच्या संकटापासून पावसाच्या स्थितीपर्यंतचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला असून यामुळे दर वाढतच असल्याचे दिसून येत आहे. परिणामी किरकोळ विक्रेत्यांची भाजी आणण्यापासून ती विकण्यापर्यंत खर्चाची बाजू वाढली आहे. यामुळे किलोच्या भावात भाजी खरेदी करणाऱया नागरिकांकडून पाव किलो, अर्धा किलो भाजी घेतली जात असल्याचे मत व्यक्त होत आहे.

रोजच्या भाजीत वापरला जाणारा टोमॅटोचा दर 50 रु. किलोवर जाऊन पोहचला होता. मात्र शनिवारच्या आठवडी बाजारात दहा किलोचा दर 300 ते 350 रु. किलो असल्याचे दिसून आले. यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटो 35 ते 40 रु. किलो असणार आहे. याशिवाय वांगी 450 रु. दहा किलो, दोडकी 450 ते 500 रु., कोबी 180 ते 190 रु. दहा किलो, कारले 400 रु., भेंडी 600 रु. दहा किलो, गवार 350 ते 400 रु., घेवडा 500 रु. दहा किलो असल्याचे दिसून आले. एरव्ही 10 रु. ला मिळणारा फ्लॉवर 20 रु. नग आहे. यामुळे दराची वाढ सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडून टाकणारी आहे.

पालेभाज्यांच्या दरांचा विचार करता एका जुडीचा दर 10 ते 20 रु. आहे. मात्र मागील दोन आठवडय़ांच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. पावसामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली होती. मात्र, या आठवडय़ात पालेभाज्यांच्या दरात शेकडानुसार शंभर दोनशेचा फरक असल्याचे दिसून येत आहे. पालक 300 ते 400 रु. शेकडा, मेथी 600 ते 800 रु., कोंथिबीर 600 रु. शेकडा, लालभाजी 400 रु. शेकडा, शेपू 600 ते 700 रु. शेकडा असा दर आहे. यामुळे किरकोळ बाजारात जुडीचे दर 10 रु.च्या पुढेच आहेत.

Related Stories

यरगट्टीजवळ अपघातात तीन ठार

Patil_p

जांबोटी येथे दूर्गामाता दौडीला प्रारंभ

Patil_p

जिल्हय़ात कोरोनाची धास्ती वाढली

Patil_p

सलून चालकांना दिले ऑटोमॅटिक सॅनिटायझर

Patil_p

वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर

Patil_p

बेळगाव- चेन्नई व्हाया म्हैसूर विमानसेवा होणार सुरू

Rohan_P
error: Content is protected !!