तरुण भारत

निपाणी-गोकाक नगराध्यक्ष निवडणुकीला स्थगिती

जिल्हाधिकाऱयांचा आदेश : उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच होणार निवडणूक

प्रतिनिधी/ निपाणी

उच्च न्यायालयाने राज्यातील 59 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे जिल्हय़ातील निपाणी व गोकाक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी तसा आदेश चिकोडी व बैलहोंगलच्या प्रांताधिकाऱयांना दिला आहे.

राज्य सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर त्यानुसार नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम स्थानिक प्रांताधिकारी व तहसीलदारांनी जाहीर केला होता. मात्र नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आरक्षणाविरोधातच उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन नगरपालिकेच्या पदाधिकारी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे निपाणीत 23 रोजी होणारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक लांबणार हे जवळपास निश्चित झाले होते.

त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी न्यायालयाच्या स्थगिती आदेशानुसार निपाणी व गोकाक पालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीला स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती असल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांसह नेतेमंडळी, नगरसेवक व शहरवासीयांनाही निवडणुकीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Stories

‘त्या’ महिलेच्या संपर्कातील 27 जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p

जमखंडीजवळ दुतोंडी साप विकणाऱ्या तरुणाला अटक

Rohan_P

कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिवपदी किरण जाधव

Patil_p

सूरतमधील जमातला गेलेल्या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले

Patil_p

आश्रय योजनेतील घरखर्चात दीड लाखाची वाढ

omkar B

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी पोलीस एसडीपीआयची चौकशी करणार

triratna
error: Content is protected !!