तरुण भारत

मिरवणुकांना परवानगी नाहीच

काळय़ादिनाबरोबर राज्योत्सवही केवळ साधेपणाने

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्योत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्योत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्याऐवजी केवळ काळय़ा दिनाच्या संदर्भातच चर्चा करण्यात आली. काही कन्नड संघटनांच्या मुठभर पदाधिकाऱयांनी केवळ काळय़ा दिनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करून प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काळय़ा दिनाला परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी सांगितले. तसेच राज्योत्सवदेखील साध्या पद्धतीने साजरा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सध्या कोरोनामुळे सर्वच सण तसेच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना राज्योत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविण्यात आले. वास्तविक पहाता काही मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत राज्योत्सव साजरा करणे गरजेचे आहे. मात्र काही कन्नड संघटनांच्या अट्टाहासामुळे राज्योत्सव साजरा करणे भाग पडत आहे. मात्र मिरवणुकीला परवानगी मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. सीपीएड मैदानावर पूजा केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांसाठी एकच नियम करा

राज्योत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, त्या दिवशी काही कन्नड संघटनांचे पदाधिकारी कोरोनाचे नियम भंग करून राज्योत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्याची शक्मयता नाकारता येत नाही. तेव्हा जिल्हा प्रशासनाने सर्वांना एकच नियम याप्रमाणे काम केले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. म. ए. समितीतर्फे दरवषी काळा दिन पाळला जातो. त्याबाबतच या बैठकीत अधिक चर्चा झाली. नेहमीच बेळगावमध्ये अशांतता पसरविणारे कन्नड संघटनांचे स्वयंभू कार्यकर्ते व नेते थयथयाट करत होते.

त्यांच्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी परवानगी देणार नाही, असे सांगितले. 31 ऑक्टोबरपर्यंत परवानगी दिली जात नाही. मात्र दुसऱया दिवशी म. ए. समितीला परवानगी दिली जाते म्हणून काही जण कोल्हेकुई करत होते. त्या व्यक्तींमुळेच गेल्या काही दिवसांमध्ये बेळगावमधील शांतता भंग झाली असून त्यांच्यावरच कठोर कारवाई करावी, अशी मागणी कन्नड जनतेतूनच होत आहे. पोलीस संरक्षणात दमदाटी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालणे ही काळाची गरज आहे, अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 

Related Stories

अंडर ग्राऊंड डॉक्टरांनी बाहेर पडावे

Patil_p

स्तवनिधी ब्रह्मदेवाची 24 रोजी यात्रा

Patil_p

मनपा व्याप्तित 406 नागरीक होम क्वारंटाईन

Patil_p

बेंगळूर : ४८ तासासाठी दोन खासगी रुग्णालये सील

triratna

आढावा बैठकीत पिडीओंची केली कानउघाडणी

Patil_p

काँगेसरोड शेजारील जलवाहिन्या घालण्याचे काम रखडले

Patil_p
error: Content is protected !!