तरुण भारत

एअर रायफल नेमबाजीत इलावेनिल, तुषारचा सहभाग

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बांगलादेश नेमबाजी फेडरेशनतर्फे ऑनलाईनद्वारे घेतल्या जाणाऱया शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत भारताचे इलावेनिल वलरिवन आणि शाहू तुषार माने सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय रायफल संघटनेच्या प्रवक्त्याने शनिवारी दिली.

ऑनलाईनवरील ही आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धा रविवारी घेतली जाणार असून शेख रसेल यांच्या जयंतीनिमित्त सदर स्पर्धा आयोजित केली आहे. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबर रेहमान यांचे शेख रसेल हे कनि÷ चिरंजीव असून बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांचे ते बंधू आहेत. शेख रसेल आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी भारताची महिला नेमबाज इलाव्हेनिल सहभागी होत आहे. सध्या महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजांच्या मानांकनात भारताची इलाव्हेनिल पहिल्या स्थानावर आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय सराव शिबिरात ती आपल्या परीक्षेमुळे सहभागी होऊ शकली नव्हती. बांगलादेशतर्फे आयोजित केलेल्या या नेमबाजी स्पर्धेत सात देशांचे नेमबाज सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके दिली जातील.

Related Stories

क्वॉरंटाईननंतर जोस बटलर सज्ज

Patil_p

मनोज तिवारीची नेमबाज होण्याची इच्छा

Patil_p

पाक हॉकीपटूंकडून किमती वस्तूंचे स्मगलिंग : हनिफ खान

Patil_p

विश्व कसोटी चॅम्पियन्सशीपचा अंतिम सामना 2021 च्या जूनमध्ये

Patil_p

मँचेस्टर युनायटेडचे माजी फुटबॉलपटू डय़ुने कालवश

Patil_p

शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर

prashant_c
error: Content is protected !!