तरुण भारत

हरियाणा : पुढील 5 वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करणार

ऑनलाईन टीम / चंदीगढ : 

हरियाणा सरकार येत्या पाच वर्षांत युवकांना एक लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी सरकारकडून विशेष नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क महसूल वाढवण्याचाही राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पुढील वर्षापर्यंत हा महसूल सात हजार कोटींपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे, मुख्यमंत्री मनोहरलाल  खट्टर यांनी म्हटले आहे.

मनोहरलाल म्हणाले, मागील सहा वर्षांत गुणवत्तेच्या आधारावर हरियाणात जवळपास 85 हजार पदांची भरती करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांत एक लाखांहून अधिक सरकारी पदांची भरती केली जाईल. ज्यांची गुणवत्तेवर नियुक्ती करण्यात आली आहे ते जनतेच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील आणि भ्रष्टाचारापासून दूर राहतील. 

मागील सहा वर्षांत माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला. त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे, असेही मनोहरलाल म्हणाले.

Related Stories

हजार विमानोड्डाणे हिमवादळामुळे रद्द

Patil_p

संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तान तोंडघशी

Patil_p

उत्तराखंड : भाजपचे प्रदेश अध्यक्ष बंशीधर भगत यांच्या मुलाला कोरोनाची बाधा

pradnya p

अधिवेशनाचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला

Patil_p

जनगणना, एनपीआरचे काम पुढील वर्षापर्यंत लांबणीवर

Patil_p

महाराष्ट्रात 24,619 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 398 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!