तरुण भारत

पाकचा उमर गुल निवृत्त

वृत्तसंस्था/ कराची

पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमर गुलने सध्या सुरू असलेल्या नॅशनल टी-20 चषक स्पर्धेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

Advertisements

17 वर्षाच्या कारकिर्दीत 36 वर्षीय उमर गुलने 2016 मध्ये पाकतर्फे शेवटचा वनडे सामना खेळला होता. नॅशनल कप स्पर्धेत तो बलुचिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करीत असून रविवारी ही स्पर्धा संपणार आहे. त्याचा संघ शुक्रवारी पराभूत झाल्यानंतर उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून त्याचा संघ बाहेर पडला आहे. 2003 मध्ये त्याने वनडेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने कसोटी पदार्पणही केले होते. 2013 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याने 47 कसोटीत 34.06 धावांच्या सरासरीने 163 बळी मिळविले तर 130 वनडे सामन्यांत 179 बळीही टिपले आहेत. याशिवाय 60 टी-20 सामन्यांत 85 बळीही त्याच्या नावावर नोंद आहेत. भारताविरुद्ध 2004 मध्ये झालेल्या लाहोर कसोटीत त्याने पाच बळी टिपण्याची कामगिरी केली होती. पण नंतर त्याला पाठीच्या खालील भागात स्ट्रेसप्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले होते.

तो सध्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट समितीचा सदस्य म्हणून काम पाहत असून त्याला अन्य भूमिकेत क्रिकेटची यापुढेही सेवा करण्याची इच्छा असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. पीसीबी, प्रशिक्षक, चाहते, संघसहकारी आणि अनेक मार्गाने पाठिंबा दिलेल्यांचे त्याने आभार मानले आहेत.

Related Stories

आयसीसी कसोटी मानांकनात कोहली-विल्यम्सन संयुक्त दुसऱया स्थानी

Patil_p

ऐच्छिक नेमबाजी शिबीर लांबणीवर

Patil_p

महेंद्रसिंग धोनी होणार आता मुंबईकर!

Patil_p

सराव सुरु करण्याबाबत दिशानिर्देश द्यावेत

Patil_p

दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडचा डावाने विजय

Patil_p

स्पेनचा डेव्हिड ग्रँड जमशेदपूर एफसी संघात दाखल

Patil_p
error: Content is protected !!