तरुण भारत

कोलकाता-हैद्राबाद आज महत्त्वाचा सामना

वृत्तसंस्था/ अबुधाबी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे नवा कर्णधार मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैद्राबाद संघाबरोबर खेळविला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी दुपारी साडेतीन वाजता प्रारंभ होईल.

Advertisements

कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर फलंदाजीची समस्या निर्माण झाली आहे. पण रविवारच्या सामन्यात या संघातील फलंदाज समाधानकारक कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. स्पर्धेच्या गुणतक्त्यात सनराझयर्स हैद्राबादचा संघ  सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दिनेश कार्तिकची कर्णधारपदाची कामगिरी उठावदार होत नसल्याने रविवारच्या सामन्यात कोलकाता संघाचे नेतृत्व इंग्लंडचा मॉर्गन करणार आहे. या स्पर्धेतील शुक्रवारच्या सामन्यात कोलकाता संघाला मुंबई इंडियन्स संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. मुंबई इंडियन्सने हा सामना एकतर्फी आठ गडय़ांनी जिंकला होता. स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्या चार संघांमध्ये आहे. मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱया, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर तिसऱया आणि कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता संघाने आतापर्यंत या स्पर्धेत चार सामने गमविले असून चार सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाकडून त्यांना 82 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही. कोलकाता संघातील फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांसमोर भक्कम फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे रविवारच्या सामन्यात फलंदाजीतील त्रुटी सुधारण्यासाठी कोलकाताचे फलंदाज प्रयत्न करतील. कर्णधार मॉर्गन, शुभम गिल, नागरकोटी हे कोलकाता संघातील भरवंशाचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. कमिन्सकडून आक्रमक फटकेबाजी होऊ शकते.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैद्राबादचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर असून त्यांनी आतापर्यंत आठपैकी तीन सामने जिंकले आहेत. हैद्राबादचा संघ आपले अस्तित्व राखण्यासाठी झगडत आहे. भुवनेश्वर कुमार आणि मिशेल मार्श हे अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेले नाहीत. वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे आणि केन विल्यमसन यांच्या फलंदाजीवरच हैद्राबादची भिस्त राहील. गेल्या दोन सामन्यात रशिद खानची फिरकी प्रभावी ठरलेली नाही.

Related Stories

यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल : रोहित

Rohan_P

कसोटी मानांकनात पुजारा सहाव्या स्थानी

Patil_p

प्रशिक्षक क्लुसनरच्या वेतनामध्ये कपात

Patil_p

यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी भारतात

Patil_p

मॅटेव बेरेटिनी, हय़ुबर्ट हुर्काझची उपांत्य फेरीत धडक

Amit Kulkarni

कोण आहे राहुल तेवातिया?

Patil_p
error: Content is protected !!