तरुण भारत

शिखर धवनचे 57 चेंडूत झंझावाती शतक

आयपीएल साखळी लढत : दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नईवर रोमांचक विजय, अक्षर पटेलकडून रविंद्र जडेजाची धुलाई

वृत्तसंस्था/ शारजाह

Advertisements

डावखुऱया शिखर धवनचे झुंजार शतक व शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना 3 उत्तूंग षटकार खेचणाऱया अक्षर पटेलच्या (5 चेंडूत नाबाद 21) धमाकेदार फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. या लढतीत चेन्नईने 4 बाद 179 धावा केल्या तर दिल्लीने 19.5 षटकात 5 बाद 185 धावांसह धमाकेदार विजय संपादन केला. शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावांचे योगदान दिले.

जडेजाच्या डावातील शेवटच्या षटकात दिल्लीला 16 धावांची गरज असताना पहिला चेंडू वाईड गेला तर धवनला पुढे एकेरी धाव घेता आली. अक्षर पटेलने उत्तूंग षटकार खेचत अचानक समीकरणांची उलथापालथ होऊ शकेल, असे संकेत दिले आणि पुन्हा षटकार खेचत जडेजावर आणखी दडपण आणले. शेवटच्या 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना त्याने दोन धावा घेतल्या आणि सामना बरोबरीत आला. 2 चेंडूत 1 धाव असे समीकरण असताना अक्षरने आणखी एक षटकार खेचला आणि दिल्लीला रोमांचक विजय प्राप्त करुन दिला.

चेन्नईची फटकेबाजी निष्फळ

तत्पूर्वी, फॅफ डय़ू प्लेसिस (47 चेंडूत 58), शेन वॅटसन (28 चेंडूत 36), अम्बाती रायुडू (25 चेंडूत नाबाद 45) व रविंद जडेजा (13 चेंडूत नाबाद 33) यांच्या फटकेबाजीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 षटकात 4 बाद 179 धावांपर्यंत मजल मारली. रायुडू व जडेजा यांची शेवटच्या काही षटकातील जोरदार फलंदाजी चेन्नईच्या डावाचे ठळक वैशिष्टय़. या जोडीने अवघ्या 21 चेंडूतच 50 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.

चेन्नईने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा. पण, युवा मध्यमगती गोलंदाज तुषार देशपांडेने पहिल्या षटकातील तिसऱया चेंडूवर सलामीवीर सॅम करणला झेलबाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला होता. उत्तम उसळलेल्या चेंडूवर सॅम करणने थर्डमॅनवरील नोर्त्जेकडे सोपा झेल दिला. त्यानंतर फॅफ डय़ू प्लेसिस (47 चेंडूत 58) व शेन वॅटसन (28 चेंडूत 36) या जागतिक स्तरावरील दोन अव्वल, अनुभवी फलंदाजांनी 11.1 षटकत 87 धावांची दमदार भागीदारी साकारली.

प्लेसिसच्या खेळीत 6 चौकार व 2 षटकार तर शेन वॅटसनच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश राहिला. या जोडीने धावफलक हलता ठेवत असतानाच धावांची आतषबाजी देखील केली होती.

अखेर नोर्त्जेने वॅटसनचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. वॅटसनने किंचीत बाजूला सरकत ऍक्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, यात त्याला यश आले नाही.

वॅटसन बाद झाल्यानंतर प्लेसिसचा रबाडाने बळी घेतला. यापूर्वी एक सोपा झेल सोडणाऱया धवनने येथे प्लेसिसचा अवघड झेल टिपला. लाँगऑनवर पुढे डाईव्ह घेत त्याने झेल पूर्ण केला. खराब फॉर्ममधील धोनीला (3) या लढतीतही सूर सापडला नाही. त्याने नोर्त्जेच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात यष्टीमागे ऍलेक्स कॅरेकडे सोपा झेल दिला. त्यानंतर मात्र अम्बाती रायुडू व रविंद्र जडेजा ही जोडी दिल्लीच्या गोलंदाजांवर चांगलीच बरसत राहिली. या जोडीने 21 चेंडूतच 50 धावांची अभेद्य भागीदारी साकारली आणि यामुळे चेन्नईला 179 धावांपर्यंत मजल मारता आली.

धावफलक

चेन्नई सुपरकिंग्स : सॅम करण झे. नोर्त्जे, गो. तुषार देशपांडे 0 (3 चेंडू), फॅफ डय़ू प्लेसिस झे. धवन, गो. रबाडा 58 (47 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), शेन वॅटसन त्रि. गो. नोर्त्जे 36 (28 चेंडूत 6 चौकार), अम्बाती रायुडू नाबाद 45 (25 चेंडूत 1 चौकार, 4 षटकार), महेंद्रसिंग धोनी झे. कॅरे, गो. नोर्त्जे 3 (5 चेंडू). रविंद्र जडेजा नाबाद 33 (13 चेंडूत 4 षटकार). अवांतर 4. एकूण 20 षटकात 4 बाद 179.

गडी बाद होण्याचा क्रम  : 1-0 (सॅम करण, 0.3), 2-87 (वॅटसन, 11.4), 3-109 (प्लेसिस, 14.4), 4-129 (धोनी, 16.3).

गोलंदाजी  : तुषार देशपांडे 4-0-39-1, कॅगिसो रबाडा 4-1-33-1, अक्षर पटेल 4-0-23-0, नोर्त्जे 4-0-44-2, रविचंद्रन अश्विन 3-0-30-0, स्टोईनिस 1-0-10-0.

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. व गो. चहर 0 (2 चेंडू), शिखर धवन नाबाद 101 (58 चेंडूत 14 चौकार, 1 षटकार), अजिंक्य रहाणे झे. करण, गो. चहर 8 (10 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर झे. प्लेसिस, गो. ब्रेव्हो 23 (23 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), स्टोईनिस झे. रायुडू, गो. ठाकुर 24 (14 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), ऍलेक्स कॅरे झे. प्लेसिस, गो. करण 4 (7 चेंडू), अक्षर पटेल नाबाद 21 (5 चेंडूत 3 षटकार). अवांतर 4. एकूण 19.5 षटकात 5 बाद 185.

गडी बाद होण्याचा क्रम  : 1-0 (शॉ, 0.2), 2-26 (रहाणे, 4.1), 3-94 (अय्यर, 11.3), 4-137 (स्टोईनिस, 15.4), 5-159 (कॅरे, 18.1).

गोलंदाजी  : दीपक चहर 4-1-18-2, सॅम करण 4-0-35-1, शार्दुल ठाकुर 4-0-39-1, रविंद्र जडेजा 1.5-0-35-0, कर्ण शर्मा 3-0-34-0, डेव्हॉन ब्रेव्हो 3-0-23-1.

Related Stories

अभिषेक, अंकिता, ज्योतीची आगेकूच

Patil_p

प्रशिक्षक राफाएल बर्गमॅस्को यांचा मायदेशी परतण्याचा निर्णय

Patil_p

सराव सामन्यात भारत अ विजयी

Patil_p

ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय महिला संघांची घोषणा

Patil_p

श्रीलंकेतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा रद्द

Patil_p

ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर मात

Patil_p
error: Content is protected !!