तरुण भारत

दुबईत घोंघावले ‘सुपरमॅन’चे वादळ!

एबी डीव्हिलियर्सची 22 चेंडूत 55 धावांची झंझावाती खेळी, आरसीबी 7 गडी राखून विजयी, राजस्थानचा धुव्वा

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisements

सुपरमॅन एबी डीव्हिलियर्सच्या 22 चेंडूतील 55 धावांच्या ‘सुपरहय़ूमन’ वादळात प्रतिस्पर्धी राजस्थान रॉयल्सचा शनिवारी अक्षरशः धुव्वा उडाला. आयपीएल साखळी फेरीतील या लढतीत राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 177 धावांचा डोंगर रचला. पण, प्रत्युत्तरात डीव्हिलियर्सने नाबाद, झंझावाती खेळी साकारली आणि त्या बळावर आरसीबीने 19.4 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यातच 179 धावांसह विजय संपादन केला.

शेवटच्या 2 षटकात 35 धावांची गरज असताना एबी डीव्हिलियर्सने ओळीने सलग 3 षटकार खेचत उनादकटच्या गोलंदाजीतील जानच काढून घेतली. यातील आश्चर्य म्हणजे यातील पहिला षटकार मिडविकेट, दुसरा षटकार वाईड लाँगऑन तर तिसरा षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावत एबीडीने चौफेर फटकेबाजीची छोटीशी चुणूक दाखवून दिली. चौथ्या चेंडूवर त्याने एकेरी धाव घेतली. पुढील चेंडू वाईड पडला व नंतर गुरकिरतने पाचव्या चेंडूवर चौकार व शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव वसूल केली. उनादकटच्या या 6 चेंडूत आरसीबीने एकूण 25 धावा वसूल केल्या आणि येथेच खऱया अर्थाने विजय आरसीबीच्या आवाक्यात आला.

शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना गुरकिरतने पहिल्या चेंडूवर 2 धावा तर दुसऱया चेंडूवर एकेरी धाव घेतली. 4 चेंडूत 7 असे समीकरण असताना डीव्हिलियर्सने दोन धावा घेतल्या आणि 3 चेंडूत 5 धावा आवश्यक असताना डीप मिडविकेटच्या दिशेने उत्तूंग षटकार खेचत संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब केले. येथेच त्याने आपले अर्धशतकही धुमधडाक्यात साजरे केले.

स्मिथ-उत्थप्पाची फटकेबाजी

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 6 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथने 36 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 57 तर रॉबिन उत्थप्पाने 22 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 41 धावांचे योगदान दिल्या. जोस बटलरने 25 चेंडूत 24 धावा केल्या. गोलंदाजीत आरसीबीतर्फे ख्रिस मॉरिस सर्वात यशस्वी ठरला. त्याने 4 षटकात 26 धावांमध्येच 4 बळी घेतले. फिरकीपटू यजुवेंद्र चहलने 4 षटकात 34 धावा देत 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

धावफलक

?राजस्थान रॉयल्स : रॉबिन उत्थप्पा झे. फिंच, गो. चहल 41 (22 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), बेन स्टोक्स झे. डीव्हिलियर्स, गो. मॉरिस 15 (19 चेंडूत 2 चौकार), संजू सॅमसन झे. मॉरिस, गो. चहल 9 (6 चेंडू), स्टीव्ह स्मिथ झे. शाहबाज, गो. मॉरिस 57 (36 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), जोस बटलर झे. सैनी, गो. मॉरिस 24 (25 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), राहुल तेवातिया नाबाद 19 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), जोफ्रा आर्चर पायचीत गो. मॉरिस 2 (3 चेंडू). अवांतर 10. एकूण 20 षटकात 6 बाद 177.

गडी बाद होण्याचा क्रम  : 1-50 (स्टोक्स, 5.4), 2-69 (उत्थप्पा, 7.4), 3-69 (सॅमसन, 7.5), 4-127 (बटलर, 15.3), 5-173 (स्मिथ, 19.2), 6-177 (आर्चर, 19.6).

गोलंदाजी : वॉशिंग्टन सुंदर 3-0-25-0, ख्रिस मॉरिस 4-0-26-4, उदाणा 3-0-43-0, नवदीप सैनी 4-0-30-0, यजुवेंद्र चहल 4-0-34-2, शाहबाज अहमद 2-0-18-0.

?आरसीबी : देवदत्त पडिक्कल झे. स्टोक्स, गो. तेवातिया 35 (37 चेंडूत 2 चौकार), ऍरॉन फिंच झे. उत्थप्पा, गो. गोपाल 14 (11 चेंडूत 2 चौकार), विराट कोहली झे. तेवातिया, गो. कार्तिक त्यागी 43 (32 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), एबी डीव्हिलियर्स नाबाद 55 (22 चेंडूत 1 चौकार, 6 षटकार), गुरकिरत सिंग नाबाद 19 (17 चेंडूत 1 चौकार). अवांतर 13. एकूण 19.4 षटकात 3 बाद 179.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-23 (फिंच, 3.3), 2-102 (देवदत्त, 12.6), 3-102 (विराट, 13.1).

गोलंदाजी : जोफ्रा आर्चर 3.4-0-38-0, श्रेयस गोपाल 4-0-32-1, कार्तिक त्यागी 4-0-32-1, जयदेव उनादकट 4-0-46-0, राहुल तेवातिया 4-030-1.

Related Stories

ऍन्सी सोजनला दोन सुवर्णपदके

Patil_p

इंग्लंडच्या पहिल्या डावाला डळमळीत प्रारंभ

Patil_p

इंग्लंड 4 बाद 192

Patil_p

बाबर आझम, इमाम उल हक पहिल्या कसोटीतून बाहेर

Patil_p

नदालला हरवून व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

गोलंदाजी मानांकनात ब्रॉडची तिसऱया स्थानावर झेप

Patil_p
error: Content is protected !!