तरुण भारत

देवत्व देण्याआधी स्त्रीला तिचे अधिकार मिळू द्या

ऑनलाईन टीम / पुणे : 

स्त्री रूपातील शक्तींना वंदन करण्याची आपली परंपरा आहे. नवरात्रौत्सवात माझे कर्तृत्व सिद्ध होऊ दे, असे साकडे प्रत्येक स्त्री घालते. आजच्या काळातील स्त्री खंबीर आहे. कोणत्याही संकटांना धीटपणे सामोरी जात आहे. स्त्रीला देवत्व मिळण्याआधी तिला तिचे अधिकार मिळू द्या, असे आवाहन माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले. 

कथक, भरतनाट्यम, लावणी आणि बेली डान्सच्या माध्यमातून साकारलेल्या तू विश्वअर्धांगिनी या हिंदी गीताचे लोकार्पण हिंगण्यातील कर्वे स्त्री संस्थेच्या आवारात असलेल्या गुरुतुल्य महर्षी, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या शिल्पाकृतीसमोर झाले त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. ‘रणरागिणी, वरदायिनी, रमणी माता, सखी हो कांता कभी भगिनी प्रेम, करुणा कभी हो मोहिनी हो वत्सल संहारिणी’ अशी या गीताची सुरुवात आहे. या गीताद्वारे चराचरांतील स्त्री शक्तीचे अनोखे दर्शनही या वेळी घडले.

कोरोनामुळे उद्भवलेल्या मानसिक, सामाजिक ताणतणांमुळे वातावरणावर नैराश्याचे सावट आले आहे. सण-उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्यावरही निर्बंध कायम आहेत. अशा परिस्थितीत मानवातील आंतरिक सकारात्मक शक्ती जागृत होऊन त्या शक्तीचे वातावरणातही प्रकटीकरण व्हावे, यासाठी या गीताची निर्मिती पॅनामेरा इव्हेंटस् अ‍ॅन्ड प्रॉडक्शनने केली आहे.

कुलकर्णी म्हणाल्या, स्त्रीयांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. पुरुषांशी कोणत्याही बाबतीत तुलना न करता तीने आपल्या वाटेवर चालले पाहिजे. स्त्रीची बाजू पडती आहे,  ही मानसिकता समाजातून नष्ट झाली पाहिजे. स्त्री मुळातच सक्षम असल्याने तिला देवत्व द्यायला लागू नये. 

Related Stories

अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन

datta jadhav

पुणे विभागातील 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

पुणे विभागातील 2 लाख 11 हजार 800 रुग्ण कोरोनामुक्त

pradnya p

‘रेमडेसिवीर’च्या वापरावर निर्बंध

datta jadhav

सोलापूर : घरफोड्या करणार्‍या चोरट्यांना अटक ; एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

triratna

निसर्ग चक्रिवादळात नगर जिल्ह्यातील ६३२ हेक्‍टरचे नुकसान

datta jadhav
error: Content is protected !!