तरुण भारत

राशिभविष्य

रविवार दि.18 ते शनिवार दि. 24 ऑक्टोबर 2020

मेष

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. वसुली करा. नोकरीतील कामे वेळेवर केल्याने तुमची प्रशंसा होईल. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. आपसात गैरसमज होण्याची शक्मयता आहे. संसारात खर्च वाढेल. शिक्षणात आळस करू नका.

वृषभ

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मेहनत घ्यावी लागेल. अरेरावीच्या भाषेत बोलू नका. होणारे काम बिघडेल. नोकरी टिकवा. कायद्यात बसणारेच काम करण्याचा निर्णय घ्या. राजकीय सामाजिक  कार्यात अडचणी येतील. तुम्ही केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरेल. संसारात काम वाढतील. शेजाऱयाला मदत करावी लागेल. शिक्षणात जिद्दीने अभ्यास करा. कला, साहित्यात नवे शिकाल.

मिथुन

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र प्रवेश, शुक्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. नवरात्र उत्सवात मनोभावे श्री भगवतीचे नामस्मरण करता येईल. गर्दीत जाऊ नका. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कायदा कुठेही मोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल. वरि÷ांना मदत करावी लागेल. तुमच्याबद्दल संशय निर्माण झाला तरी हे सर्व तात्पुरते असेल. परीक्षा टाळू नका.

कर्क

 या सप्ताहात कन्या राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. सर्व सोपे समजू नका. नोकरीत क्षुल्लक तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा वादग्रस्त करण्याचा विनाकारण प्रयत्न होईल. लोकप्रियता टिकवता येईल. संसारातील समस्या सोडवाल. कला, साहित्य, शिक्षणात पुढे जाता येईल.

सिंह

या सप्ताहात कन्येत शुक्र प्रवेश, बुध, हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यात गोड बोला. रागाला आवर घाला. हातचे काम निसटण्याची शक्मयता आहे.त्यामुळे नम्र रहा. नोकरीत तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल. राजकीय, सामाजिक कार्यात वादाचे प्रसंग वारंवार येतील. उत्तर शोधाल. अनुभवी क्यक्तीला कमी समजू नका. तुम्ही नवे शिकाल. खंबीर व्हाल. शिक्षणात आळस करू नका. प्रति÷ा टिकेल.

कन्या

या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. संसारात खर्च वाढेल. तणाव जास्त वाढवू नका. प्रवासात घाई करू नका. धंद्यात जुळवून घ्या. पुढे संधी मिळेल. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात जवळचे लोक तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. व्यसन नको. गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात वाकडी वाट धरू नका. पोटाची काळजी घ्या. ओळखी वाढतील.

तुळ

या सप्ताहात कन्येत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात काम वाढेल. गोड बोला. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत तुमचे महत्त्व वरि÷ांना कळेल. कायदा पाळूनच कामे करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. मुद्दे उत्तम ठरतील. भेट घ्या. चर्चा करा. नोकरी मिळवा. घरातील कामे वेळेत पूर्ण होतील. कला,साहित्य, शिक्षणात प्रगती होईल.

वृश्चिक

या सप्ताहात कन्येत शुक्र प्रवेश, चंद, गुरु युती होत आहे. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. धंद्यात तडजोडीची भाषा करा. फायदा वाढेल. नोकरीत वरि÷ांना दुखवू नका. नम्रता ठेवा. राजकीय सामाजिक कार्यात एखादा निर्णय  घाईत झाल्याने विरोधक आक्रमक होतील. तुमची प्रति÷ा धोक्मयात आणण्याचा प्रयत्न करतील. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. स्वत:ची काळजी घ्या. कठोर बोलणे टाळा.

धनु

या सप्ताहात कन्येत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वादविवाद होईल. प्रकरण न वाढवता तुमच्या कामावर लक्ष द्या. धंद्यात सुधारणा करता येईल. मोठे काम मिळवता येईल. नोकरीत तुम्ही मोठे काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. दौऱयात प्रभाव वाढेल. लोकसंग्रह वाढेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगतीची संधी मिळेल.

मकर

या सप्ताहात कन्येत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यातील समस्या सोडवण्याचा मार्ग शोधता येईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. पोटाची काळजी घ्या. व्यसन नको. नोकरीत अडचणीवर मात करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व निर्माण होईल. लोकांना दुखवू नका. दूरवर विचार करून योजना बनवा. विरोधक मैत्रीसाठी येतील. शिक्षणात आळस न करता पुढे जा.

कुंभ

या सप्ताहात कन्येत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखाल. तुमचे मुद्दे राजकीय, सामाजिक कार्यात प्रभावी ठरतील. योजनांच्याकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज होईल. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा. संसारात समस्या येईल. खर्च वाढेल. शिक्षणात कला, साहित्यात पुढे जाल.

मीन

या सप्ताहात कन्या राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात नवे काम मिळण्याची आशा वाढेल. रागावर ताबा ठेवा. पोटाची काळजी घ्या. नोकरीत उतावळेपणाने वागू नका. यांत्रिक बिघाड होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा विचार व्यक्त करताना काळजी घ्या. चूक होईल. लोकांची नाराजी होईल. तुमचे गुपित उघड होऊ शकते. व्यसन करू नका. शिक्षणात मागे राहू नका. जिद्द ठेवा.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 जानेवारी 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 जुलै 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 4 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 31 जुलै 2020

Patil_p
error: Content is protected !!