तरुण भारत

रत्नागिरी (दापोली) : ‘ला निनो’च्या प्रभावाने आंबा ‘प्रभावित’ होण्याची शक्यता

मनोज पवार / दापोली

पॅसिफिक महासागरात मे महिन्यापासून सुरू झालेल्या ‘ला निनो’च्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा आंबा पीक प्रभावित होऊन आंबा लांबण्याची शक्यता आहे.

याबाबत दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हवामान संशोधन केंद्राला भेट दिली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. याबाबत बोलताना हवामान शास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. मोरे व सहाय्यक प्राध्यापक व्ही. ए. राजेमहाडिक यांनी ला-नॅनो अधिक प्रभावी झाला तर थंडी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली. मात्र थंडीचा आंब्याच्या मोहोरावर परिणाम होणार नाही. मात्र पावसाळा लांबलेला असल्याने आंब्यांच्या मुळाना ताण मिळालेला नसल्याने आंब्याचा सीझन पुढे जाईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

Related Stories

सीमाबंदी असतानाही अनेकजण येतात कसे?

NIKHIL_N

आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत रत्नागिरीची सायली साने प्रथम

Patil_p

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा आज फैसला!

Patil_p

सावर्डेतील सचिन कात इंडस्ट्रीजमधील चोरी उघड

Patil_p

कोकणला आता ‘नाणार’ हवाच!

Patil_p

तान्हुल्याच्या भेटीसाठी व्याकुळली आई

NIKHIL_N
error: Content is protected !!