तरुण भारत

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. मागील 24 तासात देशात 61 हजार 871 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1033 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 74 लाख 94 हजार 552 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 14 हजार 031 एवढी आहे. 

सध्या देशात 7 लाख 83 हजार 311 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 65 लाख 97 हजार 210 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 9 कोटी 42 लाख 24 हजार 190 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 70 हजार 173 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.17) करण्यात आल्या.

Related Stories

युरोपमध्ये 30 हजारांपेक्षा अधिक बळी

Patil_p

हिमाचल प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदी सुरेश कश्यप

pradnya p

पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदाराचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत; पार्टीने केला हत्येचा आरोप

pradnya p

लष्करी कॅन्टीन्सना आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचे आदेश

datta jadhav

दहशतवाद्याचा खात्मा; जवानही हुतात्मा

Patil_p

जिओमध्ये अमेरिकन कंपनी ‘सिल्वर लेक’ची 5,656 कोटींची गुंतवणूक

pradnya p
error: Content is protected !!