तरुण भारत

कर्नाटकात शनिवारी ७ हजाराहून अधिक रुग्णांची भर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होताना पहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे ७,१८४ रुग्ण सापडले आहेत. नेहमीप्रमाणे बेंगळूरमध्ये सर्वधिक रुग्णांची नोंद झाली आहे.बेंगळूर जिल्ह्यात शनिवारी ३,३७१ रुग्णांची नोंद झाली. तर शनिवारी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात शनिवारी ८,८९३ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला. शनिवारी राज्यात एकूण ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी १४ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत १०,४२७ लोक मरण पावले आहेत.

शनिवारी कोरोनाची राज्यात एकूण सक्रिय प्रकरणे १,१०६४७ गेली आहे. दरम्यान राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेंगळूरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६४,७७० आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी ४,२५१ रुग्ण घरी परतले आहेत. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,५०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

बेंगळुरातील स्थानिक काँगेस नेत्यांचा भाजपप्रवेश

Patil_p

शिवकुमार यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा

Patil_p

बेंगळूर पोलिसांनी तीन आंतरराज्य ड्रग तस्करांना केली अटक

Shankar_P

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्याचे मानले आभार

triratna

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज सूचना मिळणार

Shankar_P

कर्नाटक: मंगळवारी ६ हजाराहून अधिक रुग्णांची भर

Shankar_P
error: Content is protected !!