तरुण भारत

कोरोनाच्या भीतीने लोकांना समजाविले सकस आहाराचे महत्त्व

घरची थाळी पडू लागली पसंत : योग्य आहाराने दूर ठेवता येणार आजार

कोरोनाकाळात लोकांचा आहार बदलला आहे. आता आहारात काढा आणि व्हिटामिन-सी वाढविणारा निंबू देखील सामील झाला आहे. गिलोयची गोळी घेतली जात असून झोपण्यापूर्वी च्यवनप्राश खाल्ले जात आहे. याच सवयी पुढे नेण्याची गरज आहे, जेणेकरून विषाणूच नव्हे तर जिवाणूंमुळे होणारे संक्रमणही रोखता येईल आणि इम्युनिटी वाढविता येईल.

आहारात झालेले 4 बदल

1 कोरोनाने नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे शिकविले आहे. लोकांनी इम्युनिटी वाढविण्यासाठी निंबू, मोसंबी, संत्री आणि आवळय़ाला आहाराचा हिस्सा केला आहे. प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ म्हणजेच बिस्कीटे, रेडी-टू-ईट सूप, नूडल्स आणि रसायनांच्या मदतीने प्रिझर्व्ह करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांपासून अंतर राखले आहे.

2 कोरोनाने लोकांची जीवनपद्धतही पूर्णपणे बदलली आहे. लोकांनी वेळेत जेवण, झोप आणि उठण्यास प्रारंभ केला आहे. बहुतांश लोकांनी गरम आणि ताजे अन्न घेण्यावर भर दिला आहे. थंड पाणी पिणे बंद केले आहे. याचा प्रभाव गळय़ापासून पोटापर्यंत झाला आहे. अन्न सहजपणे पचत असून सर्दी-खोकला इत्यादींचा धोकाही कमी झाला आहे. याचमुळे लोकांच्या उत्साहात घट झालेली नाही.

3 लोकांनी चहाऐवजी काढा पिण्यास प्रारंभ केला आहे, परंतु गरजेपेक्षा अधिक काढय़ाचे सेवन आणि मसाल्यांच्या वापरामुळे पोटाची समस्याही झाली, परंतु लोकांनी तो वापरणे बंद केलेले नाही. याचबरोबर इम्युनिटी वाढविण्यासाठी आहारात मसाल्यांचा वापर वाढविला आहे. हळदयुक्त दूध घेण्यास सुरुवात केली आहे.

4          टाळेबंदीचा थेट प्रभाव अनेकदा बर्गर, पिझ्झा यासारखे जंक फूड खाणाऱया लोकांवर पडला आहे. अनेक महिन्यांपर्यंत लोकांनी जंक फूड मिळाले नाही आणि काही जणांनी संक्रमणाच्या भीतीने त्यापासून अंतर राखले आहे. परिणामापोटी घरात तयार अन्नापासून अनेक प्रकारचे पोषक घटक मिळाले आहते. याचबरोबर बरेच लोक मांसाहारापासूनही दूर गेले आहेत.

इम्युनिटी वाढवून   आजारांना रोखणारे बदल

कोरोनाच नव्हे तर अन्य आजारांपासूनही वाचविणारे काही बदल आहारात करण्याची गरज आहे. हे इम्युनिटी वाढविण्यात आली तरच शक्य आहे. हिवाळा तोंडावर आला असून इम्युनिटी वाढविण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो, या काळात सर्वाधिक वैविध्यपूर्ण भाज्या आणि फळे उपलब्ध होतात. हिवाळय़ात मसाल्यांचा वापरही शरीरातील उष्णता वाढविण्यासह रोगांशी लढण्याची क्षमता वाढविते.

1          खाण्यात लाल, पिवळय़ा आणि हिरव्या भाज्या-फळांचे प्रमाण वाढविण्यात यावे, त्यांच्यामध्ये शरीराला आजारांपासून वाचविणारे पोषक घटक आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. यात व्हिटामिन-ए, सी आणि ई अधिक प्रमाणात आढळते. यात टॉमेटो, पेरू, पपई, भोपळा, आंबा आणि हिरव्या भाज्यांना सामील करावे.

2          सूप तीनप्रकारे लाभ पोहोचविते, हिवाळय़ात शरीराला उष्ण ठेवते, तसेच भाज्यांचा वापर अधिक केल्याने पोषक घटकांची कमतरता भरून काढते. तसेच रोगांपासून लढण्याची क्षमता वाढविते, टोमॅटो, आलं, गाजर, लसूण आणि कोबी यासारख्या भाज्यांना सूपमध्ये सामील केले जावे. यात पनीरची भर करता येणार आहे. उन्हाळय़ात मात्र याचा मर्यादित वापर व्हावा.

3          हिवाळय़ात दिवसातून एका मूठभर सुकामेवा खाणे योग्य ठरणार आहे. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता शरीराला उष्ण ठेवतील आणि इम्युनिटी वाढवतील. सुकामेवा स्मरणशक्ती आणि त्वचेचा उजळपणा वाढविण्यासही मदत करतो. यात अँटीऑक्सिडेंट्स आणि ओमेगा-3 फॅटी असिड असते, जे हृदयविकारापासूनही वाचविते.

Related Stories

पाकच्या रेल्वेमंत्र्यांकडून भारताला अणुहल्ल्याची धमकी

datta jadhav

चीनमध्ये ‘कोरोना’ बळींची संख्या 2442 वर

tarunbharat

चीननेही तैनात केली घातक बॉम्बर विमाने

Patil_p

ब्रिटनची सम्राज्ञी-राजपुत्राची भेट

Patil_p

स्पेनमध्ये निदर्शने

Patil_p

तणाव विकोपाला

Patil_p
error: Content is protected !!