तरुण भारत

बायडेन यांच्यासाठी ओबामा मैदानात

ऑनलाईन टीम / मॅकॉन : 

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यासाठी माजी अध्यक्ष बराक ओबामा मैदानात उतरणार आहेत. 21 ऑक्टोबरपासून ओबामा बायडेन यांचा प्रचार करणार आहेत. 

बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बायडेन उपाध्यक्ष होते. ओबामा 21ऑक्टोबरपासून फिलाडेल्फिया आणि पेन्सिलव्हेनियाचा दौरा करणार आहेत. ओबामा यांचे वक्तृत्व प्रभावी असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिक गर्दी करतील, असा अंदाज डेमोक्रॅटिकच्या समर्थकांना आहे. 

रिपब्लिकनचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ओबामा यांच्या प्रचाराने निवडणुकीत काही फरक पडणार नाही, असा दावा केला आहे.

Related Stories

कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया : उध्दव ठाकरे

pradnya p

रोहिंग्याचा शरणार्थीचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

पुणे विभागात 1 हजार 457 रुग्ण; आतापर्यंत 88 मृत्यू

Shankar_P

महाराष्ट्रात 24 तासात 77 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा; दोघांचा मृत्यू

pradnya p

आफ्रिका खंड पोलिओ विषाणूमुक्त

Patil_p

हिमाचल प्रदेश : 150 मीटर खोल दरीत कोसळली कार; 4 जणांचा मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!