तरुण भारत

रत्नागिरी : पोलादपूर हद्दीत स्वीफ्ट कार जळून खाक

प्रतिनिधी / खेड

मुंबई – गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील भोगावनजीक शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट कार जळून खाक झाली. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी टकली असून कारसह अन्य साहित्यांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे.

मसूद सिद्दीकी हे आपल्या ताब्यातील स्वीफ्ट कारमधून पत्नीसह मुंबई येथून तालुक्यातील राजवेल येथील सासरवाडीत येत होते. कार भोगावनजीक आली असता अचानक बोनेटमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कार थांबवत दोघेही खाली उतरले. बोनेट उघडताच आगीचा एकच भडका उडून क्षणातच कार जळून खाक झाली.

आगीचे वृत्त कळताच पोलादपूर पोलीस कर्मचाऱ्यांसह कशेडी येथील सहाय्यक पोलीस फौजदार पी.पी. चांदणे, हे.कॉ. समेल सुर्वे, ए. आर. जाधव, एम. एम. दाभोळकर, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. चिकणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. येथील नगरपरिषदच्या बंबास पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यत कार जाळून खाक झाली होती.

Related Stories

आ. भास्करराव जाधव यांनी गुहागरसाठी लोकार्पण केली रूग्णवाहिका

Shankar_P

जिह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू

Patil_p

दापोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने प्रशासनाची धावपळ

triratna

रत्नागिरी जिल्ह्यातील समस्या जाणून घेत आखणार उपाययोजना : सीईओ जाखड

triratna

दोडामार्गातील महिला मासे विक्रेतीला वेंगुर्ल्यात धमकी

NIKHIL_N

पावसाची उसंत.. टळले उधाणाचे संकट

triratna
error: Content is protected !!