तरुण भारत

चीनला धडा शिकविणार : डोनाल्ड ट्रम्प

चिनी महामारीद्वारे बनावट भीती निर्माण : त्याचे कृत्य कधीच विसरणार नाही

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या मुद्दय़ावरून पुन्हा एकदा चीनला इशारा दिला आहे. महामारीच्या मुद्दय़ावर चीनला क्षमा करण्याची अमेरिकेची तयारी नाही. चीनचे कृत्य अमेरिका त्याला विसरू देणार नाही, असे उद्गार ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील सभेत बोलताना काढले आहेत. तर दुसऱया प्रचारसभेत ट्रम्प यांनी निवडणूक हरल्यास देश सोडेन असे विधान केले आहे.

चीनमध्ये काय होतेय हे कुणीच जाणत नाही. कारण कुणीच काहीही पाहिलेले नाही. जोपर्यंत प्लेग (कोविड-19 ला ट्रम्प काही दिवसांपासून प्लेग संबोधित आहेत) आला नव्हता, तोपर्यंत आम्ही त्यांच्यापेक्षा आघाडीवर होतो. आज आमच्या देशात दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याचमुळे चीनने आमच्यासोबत जे केले, ते अमेरिका कधीच विसरणार नाही. या विषाणूद्वारे बनावट परंतु भयानक प्रकारच्या भीतीचे वातावरण तयार करण्यात आले. कोविड-19 पूर्वी आमची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत होती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बिडेन पुन्हा लक्ष्य

मागील सभांप्रमाणेच ट्रम्प यांनी फ्लोरिडातही डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन यांना लक्ष्य केले आहे. डेमोक्रेट नसते तर चीनला जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश मिळाला नसता. अमेरिकेच्या प्रशासनाची ही ऐतिहासिक चूक होती असे ट्रम्प म्हणाले. मी अधिक देणगी जमवू शकतो, बहुधा जगात सर्वाधिक देणगी जमविणारा व्यक्ती ठरू शकतो, परंतु असे करण्याची इच्छा नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. निवडणुकीसाठी निधी जमविण्याप्रकरणी बिडेन आता ट्रम्प यांच्या पुढे गेले आहेत.

…तर देश सोडणार

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. ट्रम्प यांच्यासमोर बिडेन यांचे आव्हान आहे. जॉर्जियाच्या मॅकन शहरातील सभेत ट्रम्प यांनी जवळपास प्रत्येक मुद्दय़ावर भूमिका मांडली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खराब अध्यक्षीय उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढत आहे. मी निवडणुकीत पराभूत होईल अशी कल्पना कुणी करू शकत नाही. परंतु असे घडल्यास मी देश सोडणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखांचा टप्पा

datta jadhav

चीनचे ‘सुखोई-35’ विमान तैवानकडून टार्गेट

Patil_p

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमधून बाहेर

prashant_c

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

चीनवर ‘आंतरराष्ट्रीय’ दबावतंत्र

Patil_p

अमेरिकेत परमाणु हल्ला करणाऱ्या विमानांची गस्त

datta jadhav
error: Content is protected !!