तरुण भारत

उइगूर मुस्लीम महिलांचे मुंडन करवतोय चीन

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा दावा : नरसंहारासारखा प्रकार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

चीन स्वतःच्या मुस्लीमबहुल शिनजियांग प्रांतात पुन्हा नरसंहारासारखे काहीतरी करू पाहत आहे. चिनी प्रशासन याकरता ताबा शिबिरांमध्ये कैदेत असलेल्या मुस्लीम महिलांचे मुंडनही करवित असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी केला आहे. शिनजियांगमध्ये चीनवर नरसंहाराचा आरोप आतापर्यंत अमेरिकेच्या कुठल्याही मोठय़ा अधिकाऱयाने केला नव्हता. पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी एस्पेन इन्स्टीटय़ूटच्या ऑनलाईन कार्यक्रमात या शब्दाचा वापर केला आहे. या शब्दाचे अनेक कायदेशीर अर्थ काढून चीनवर कठोर निर्बंध लादले जाणार असल्याचे मानले जात आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार शिनजियांग प्रांतात चीनने सुमारे 10 लाखांहून अधिक उइगूर मुस्लिमांना ताबा केंद्रांमध्ये कैद करून ठेवले आहे. चीन तेथे नरसंहार करत असल्याचा आरोप अनेक मानवाधिकार संघटनांनी केला आहे.

केसांपासून सामग्रीची निर्मिती

अमेरिकन बॉर्डर कस्टमने शिनजियांगच्या मानवी केसांपासून तयार झालेली उत्पादने मोठय़ा प्रमाणावर जप्त केली आहेत. चिनी सरकार या शिबिरांमध्ये कैद उइगूर मुस्लिम महिलांचे मुंडन करून त्या केसांपासून तयार उत्पादने अमेरिकेत पाठवत असल्याचे ओब्रायन यांनी म्हटले आहे. शिनजियांग येथून येत असलेली केसांची उत्पादने आणि सामग्रीची एक खेप जप्त केल्याचे युएस कस्टम आणि बॉर्डर फोर्सने जूनमध्ये सांगितले होते.

चीनचा दावा

परंतु चिनी नेते या ताबा केंद्रांना व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र ठरवत आहेत. चीन सरकारच्या अहवालानुसार दक्षिण शिनजियांगमध्ये 2014-19 पर्यंत 4,15,000 उइगूर मुस्लिमांना कैद करून ठेवण्यात आले होते. यातील अनेकांना एकापेक्षा अधिक वेळा कैद करण्यात आले आहे. सद्यकाळात 80 लाखांपेक्षा अधिक लोक या केंद्रांमध्ये कैद आहेत.

मुस्लीम देशांचे दुर्लक्ष

उइगूर मुस्लिमांवरील अत्याचारासंबंधी आतापर्यंत कुठल्याही मुस्लीम देशाने चीनला उघडपणे विरोध केलेला नाही. सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या तोंडातून उइगुरांसंबंधी अवाक्षरही बाहेर पडले नाही. हे सर्व देश याप्रकरणी चीनचे शत्रुत्व पत्करू पाहत नाहीत.

बळजबरीने नसंबंदी

चीनने यापूर्वीच उइगूर मुस्लिमांची बळजबरीने नसबंदी आणि गर्भपात करण्याचे सत्र आरंभिले आहे. शिनजियांगच्या दुर्गम पश्चिम क्षेत्रात मागील 4 वर्षांपासून राबविल्या जाणाऱया मोहिमेला काही तज्ञ एकप्रकारे ‘लोकसांख्यिकीय नरसंहार’ ठरवत आहेत. या प्रांतात अल्पसंख्याक समुदायाच्या महिलांना नियमित स्वरुपात गर्भावस्थेची तपासणी करण्यास सांगण्यात येते. तसेच त्यांना अंतर्गर्भायशी उपकरण (इन्ट्रायुटेरिन डिव्हाइस, आययुडी) बसविण्यासह नसबंदी करविणे आणि लाखो महिलांना गर्भपात करवून घेण्यास भाग पाडले जात आहे.

Related Stories

चीनला दणका; वंदे भारत रेल्वेगाड्या बनवण्याचे कंत्राट रद्द

datta jadhav

डब्ल्यूएचओचे पथक चीन दौऱयावर

Patil_p

संपूर्ण वेस्ट बँकेवर कब्जा करणार इस्रायल

Patil_p

अमेरिकेत 46 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.50 लाखांवर

datta jadhav

पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 702 वर

pradnya p
error: Content is protected !!