तरुण भारत

धार्मिक कट्टरतेने घेतला शिक्षकाचा बळी

इस्लामशी संबंधित चित्र दाखविल्याने हत्या : फ्रान्समध्ये मारेकरी ठार

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्समध्ये एका हल्लेखोराने इतिहासाच्या शिक्षकाची गळा चिरून हत्या केली आहे. काही वेळातच पोलिसांनी हल्लेखोराला कंठस्नान घातले आहे. संबंधित शिक्षकाने काही दिवसांपूर्वी वर्गात इस्लामशी संबंधित एक छायाचित्र दाखविल्याने हल्लेखोर संतप्त झाला होता.

मारेकऱयाने शिक्षकाचा बऱयाच अंतरापर्यंत पाठला केला होता, अशी माहिती दहशतवादविरोधी विभागाने दिली आहे. संबंधित घटनास्थळ राजधानी पॅरिसपासून नजीक आहे. एका माध्यमिक शाळेत या शिक्षकाने इस्लामशी निगडित चित्र दाखविले होते. शिक्षक शाळेतून बाहेर पडताच आरोपीने पाठलाग केला. तसेच संधी साधून शिक्षकाचा गळा चिरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

4 जणांना अटक

हत्येनंतर पोलिसांच्या कारवाईत मारेकरी मारला गेला आहे. याप्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हत्येच्या घटनेची निंदा केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरत असल्यानेच शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे. शिक्षक इस्लामिक कट्टरवादाला बळी पडल्याचे उद्गार मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. मॅक्रॉन यांनी घटनास्थळाचा दौराही केला आहे

मारेकरी कोण होता?

फ्रान्स सरकार किंवा दहशतवादविरोधी विभागाने मारेकरीसंबंधी कुठल्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध केलेली नाही. परंतु हल्लेखोराचे वय 18 वर्षे होते आणि तो मूळचा चेचेन्या येथील होता. मारेकरीचा जन्म मॉस्को येथे झाला होता, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणा स्वतःचे काम करत असून याप्रकरणी योग्यवेळी माहिती दिली जाईल असे फ्रान्सच्या शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

Related Stories

लस रशियात… काळजी युरोपात

Patil_p

अमेरिकेत 50 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

रशियात 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण

Patil_p

तीव्र स्फोटानंतर लेबनॉनमध्ये नवे सरकार

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 70 हजारांवर

datta jadhav

श्रीलंका : गोहत्या बंदी विधेयक संसदेत मंजूर

datta jadhav
error: Content is protected !!