तरुण भारत

देशात चोवीस तासात 837 जणांचा मृत्यू

62 हजारांहून जास्त नवे पॉझिटिव्ह : अजूनही जवळपास 8 लाख सक्रिय रुग्ण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतात कोरोनाच्या नवीन रुग्णांची गती मंदावलेली दिसून येत आहे. तसेच मृतांचा आकडाही कमी होत चालल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे. शनिवारी देशात 62,212 नवे बाधित रुग्ण आढळले असून चोवीस तासात 837 लोक मरण पावले. त्याचबरोबर, देशातील 70 हजाराहून अधिक लोक गेल्या 24 तासात कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवार सकाळी 8 या वेळेत 70 हजार 816 लोक संसर्गातून बरे झाले. सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 7 लाख 95 हजार 087 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाची एकूण नोंद झालेली प्रकरणे 74 लाख 32 हजार 680 इतकी आहे. त्यापैकी 65 लाख 24 हजार 595 जण उपचाराअंती बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 1 लाख 12 हजार 998 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

जीवनावश्यक वस्तू कायदा बदलणार

Patil_p

आसाममधील पूरग्रस्तांसाठी अक्षयकडून 1 कोटीची मदत

Patil_p

लोकशाही निर्देशांकात भारताचे स्थान घसरले

Patil_p

चिंता वाढली : देशात गेल्या 24 तासात 12881 नवे कोरोना रुग्ण; 334 जणांचा मृत्यू

pradnya p

बाबरी विध्वंस प्रकरणात आज निवाडा

Patil_p

सुखोई, तेजस विमानांसाठी एचएसएलडी बॉम्बची निर्मिती

Patil_p
error: Content is protected !!