तरुण भारत

जेट एअरवेजला मिळाला नवा मालक

कॅलरॉक कॅपिटल-मुरारीलाल जालान कन्सोर्टियमने जिंकला लिलाव

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

लंडनच्या कॅलरॉक कॅपिटल आणि युएईमधील गुंतवणूकदार मुरारी लाल जालान यांनी संयुक्तपणे ‘जेट एअरवेज’वर ताबा मिळवला आहे. कॅलरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालान यांनी दिलेल्या प्रस्तावाला एअरलाईन्स कंपनीने सकारात्मकता दर्शवल्याने आता याची मालकी त्यांच्या कन्सोर्टियमकडे जाणार आहे. आर्थिक समस्यांमुळे एप्रिल 2019 पासून जेट एअरवेजची सेवा खंडित झाली असून अनेक विमानतळांवर त्यांची विमाने पार्क केलेल्या अवस्थेत पडून आहेत.

जेट एअरवेज मंडळाचे सदस्य मनोज मदनानी यांनी कॅलरॉक कॅपिटलने बोली जिंकल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. कॅलरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालान यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमकडे जेट एअरवेजचा ताबा देण्याच्या दृष्टीने मंडळाच्या बहुतांश सदस्यांनी होकार दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कन्सोर्टियमने दिलेल्या प्रस्तावाच्या बाजूने किती मते मिळाली हे उघड झाले नाही. बहुमतासाठी किमान 66 टक्के मते आवश्यक होती.

जेट एअरवेजला दिवाळखोर घोषित करण्यासाठी जून 2019 मध्ये ‘एनसीएलटी’कडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर आतापर्यंत बोर्ड सदस्यांची 16 वेळा भेट झाली होती. दिवाळखोरी प्रक्रिया यावषी जूनमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती, परंतु लॉकडाउनच्या प्रतिबंधामुळे ती 21 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. नंतर तो ठराव व्यावसायिकांनी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला होता.

कॅलरॉक कॅपिटलची 886 कोटींची ऑफर

जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी कॅलरॉक कॅपिटलच्या नेतृत्वात असलेल्या कन्सोर्शियमशिवाय हरियाणाचे फ्लाईट सिम्युलेशन टेक्निक सेंटर आणि अबूधाबीच्या इम्पीरियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एलएलसी यांचा या लिलावामध्ये समावेश होता. उपलब्ध माहितीनुसार कॅलरॉक कॅपिटलच्या नेतृत्वात असलेल्या कन्सोर्टियमने थकीत थकबाकी परतफेड करण्यासाठी जेट एअरवेजच्या कर्जदारांना एकूण 886 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. हा आकडा फ्लाईट सिम्युलेशन तंत्रज्ञान केंद्राच्या ऑफरपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Related Stories

राफेल विमानांचे जल्लोषात आगमन

Patil_p

भारतीय वंशाचा डॉक्टर न्यूयॉर्कचा आरोग्य आयुक्त

Patil_p

जीसॅट-30 उपग्रहाचे 17 रोजी प्रक्षेपण

Patil_p

पँगॉग तलाव क्षेत्रात अजूनही भारत-चीन सैन्य आमनेसामने

datta jadhav

केंद्र सरकारकडून वाहनधारकांना दिलासा

Patil_p

80 वर्षी वृद्धेचा कोरोनावर विजय

Patil_p
error: Content is protected !!