तरुण भारत

हेलिकॉप्टर अपघातातून रविशंकर प्रसाद बचावले

पटना / वृत्तसंस्था

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बिहार दौऱयावर असलेले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद शनिवारी एका हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्मयात बचावले. पटना विमानतळावर हेलिकॉप्टरचे लँडिंग केले जात असताना ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. यावेळी हेलिकॉप्टरचे दोन ते तीन ब्लेड तुटूनही पायलटने सावधगिरीने हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे सर्वजण सुखरुप राहिले. हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर प्रसाद यांच्यासह बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडय़े आणि जलसिंचन मंत्री संजय झा उपस्थित होते. त्यांना कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Related Stories

नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

प्रशांत किशोरांचे शाह यांना आव्हान

Patil_p

भाजपला लाभ, तरीही ‘आप’ वरचढ

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ कपात

Patil_p

सुर्यावरील सूक्ष्म स्फोटांचा शोध

datta jadhav

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!