तरुण भारत

केपेतील दुर्गापूजनोत्सव यंदा मर्यादित स्वरूपात

वार्ताहर/ केपे

गेली 10 वर्षे केपे बाजारातील नगरपालिका उद्यानात सार्वजनिक दुर्गापूजा आयोजित केली जात असे. त्याचबरोबर 9 रात्री तेथे दांडिया नृत्य होत असे. पण यंदा कोविड-19 महामारीमुळे देशभरात दुर्गापूजा साध्या पद्धतीने होणार असून या पार्श्वभूमीवर केपेतही मर्यादित स्वरूपात दुर्गापूजेचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. देवी दुर्गेच्या मूर्तीची स्थापना यंदा येथील मुदेश्वर देवस्थानात केली गेली असून या स्थापनेच्या वेळेस बोलताना उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी ही माहिती दिली. 

दुर्गादेवी संस्था ही केपेत गेली 10 वर्षे दुर्गापूजा आयोजित करत आली आहे. देवी दुर्गेच्या मूर्तीच्या स्थापनेच्या वेळेस उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्यासोबत संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बोरकर, उपाध्यक्ष संदीप फळदेसाई, उद्योजक योगेश कुंकळय़ेकर आणि इतर सदस्य व भाविक उपस्थित होते.

दुर्गादेवी मंडळाने गेली 10 वर्षे भरीव काम केले असून संस्थेची वाटचाल वाखाणण्याजोगी आहे, असे उपमुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले. देवीच्या दर्शनास येणाऱया भाविकांनी सामाजिक अंतर सांभाळूनच मुदेश्वर देवस्थानात दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 18 पासून देवीसमोर संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान योगवर्ग घेण्यात येणार आहे. तसेच दुपारी आणि संध्याकाळी रोज आरत्या होणार असून प्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे उपाध्यक्ष फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रेमानंद नाईक, रामनाथ नाईक, संतोष फडते व अन्य हजर होते.

Related Stories

कोरोना संशयिताच्या घराचे निर्जंतुकीकरण

omkar B

गुलमोहरकार जयराम कामत यांचे निधन

omkar B

सुर्याकांत गावकर याना गोवा राज्य जैवविविधता संवर्धन पुरस्कार 2020 जाहीर

omkar B

‘डीएसएसएस’चे पैसे ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा करा

omkar B

आषाढी एकादशीचे आज केवळ औपचारिक कार्यक्रम

Patil_p

डॉ. भाटीकर यांच्या साहाय्याने दीपनगर प्रकाशमान

Patil_p
error: Content is protected !!