तरुण भारत

मांद्रे येथील देवी महालक्ष्मीचे पूजन

वार्ताहर/ पालये

कोरोना संकट दूर होऊन समस्त मानव जातीला चांगले आरोग्य लाभावे यासाठी मांद्रे येथील महालक्ष्मी मंदिरात ऍड. रमाकांत खलप यांच्या यजमानाखाली देवी महालक्ष्मीचे वार्षिक पूजन आणि देवीला गाऱहाणे घालण्यात आले.

मांद्रे येथील सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ऍड. खलप यांनी महालक्ष्मीचे मंदिर उभारले असून, दरवर्षी घटस्थापनेच्यावेळी या देवीचे खास पूजन करण्यात येते. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पुरोहित आनंद बर्वे यांच्या पौराहित्याखाली देवीचे पूजन करण्यात आले. तसेच समस्त मानवजातीवर आलेले कोरोनाचे संकट दूर करून मुलांच्या शाळा पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी देवीमातेला खास गाऱहाणे घालण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला सप्तेश्वर, उच्च माध्यमिक विद्यालय, मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स व आर. डी खलप हायस्कूलचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते तसेच व्यवस्थापन समितीचे ऍड. अमित सावंत उपस्थित होते.

या सर्वांना ऍड. खलप यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी कार्य करण्याची विनंती केली. तसेच सरकारने मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या भवितव्याच्या विचार करून त्याला अनुदान देण्यासाठी प्रयत्न करावे असे आपल्या भाषणातून सांगितले.

Related Stories

पतसंस्था बंद असल्याने सुमारे पाच लाख खातेदारांना फटका

omkar B

उत्पल पर्रीकरांकडून प्लाझ्मा दान

Patil_p

गोव्यातून दुसरी श्रमिक कोकण रेल्वे उधमपूरसाठी रवाना

omkar B

मासेमारीसाठी गेल्यावेळी बेपत्ता झालेल्या युवकाचा थांगपत्ता नाही

Patil_p

रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने कलाक्षेत्राला धक्का : कामत

omkar B

राज्यातील बेकायदेशीर कत्तलखाने रोखण्यात सरकार अपयशी

omkar B
error: Content is protected !!