तरुण भारत

विश्वासार्हता म्हणजे ‘लोकमान्य’ सोसायटी

उत्तर गोवा क्षेत्रीय कार्यालयाचे म्हापशात उद्घाटन

प्रतिनिधी/ म्हापसा

‘तरुण भारत’ आणि ‘लोकमान्य’ मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड या दोन्ही  आस्थापनांनी राज्यात अनेक युवा-युवतींना रोजगार मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. एक विश्वासार्हता संस्था म्हणून गोमंतकीय लोकमान्य सोसायटीकडे पाहत आहेत. म्हणून गोमंतकीय लोक आपल्या ठेवी त्यांच्याकडे ठेवतात व व्यवहार करतात. यापुढे जाऊन लोकमान्य सोसायटीने गोव्यातील वेगवेगळय़ा पद्धतीच्या व्यवहारात गुंतवणूक करावी. राज्य सरकारने प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशीप सुरू केली आहे. जे कुणी यासाठीही गुंतवणूक करू पाहत आहे त्यांनीही ती करावी, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काही दिवसांनी आम्ही गुंतवणूक मित्रता राज्य म्हणून पुढे येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर लोकमान्य उत्तर गोवा क्षेत्रीय कार्यालयाचे म्हापसा येथील बोशान क्लासिक बोडगेश्वर मंदिराजवळील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांनी रितसर फित कापून व दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. उद्घाटनानंतर त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर, संचालिका सई ठाकूर बिजलानी, प्रीतम बिजलानी, लोकमान्यचे उत्तर गोवा क्षेत्रीय व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, बोशान होमचे मालक अमर गायतोंडे, मंगलदास नाईक, शांताराम नाईक, दक्षिण गोवा क्षेत्रीय कार्यालय व्यवस्थापक सुहास खांडेपारकर, अँथोनी आझावेदो यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, घटस्थापनेच्या दिवशी म्हापशात लोकमान्य सोसायटीनी उत्तर गोवा क्षेत्रीय कार्यालयाचा शुभारंभ केला त्यास आपल्या  शुभेच्छा आहेत. लोकमान्य सोसायटी गोवा राज्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली येथे कार्यान्वित आहे, याचा फायदा जनतेला होत आहे. या सोसायटीने एक विश्वासाचे नाते निर्माण केले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

‘तरुण भारत’ व लोकमान्य या दोन्ही संस्था जनतेबरोबर आहे. या दोन्ही संस्थांतर्फे वेगवेगळे उपक्रम चालू असतात. लोकमान्यचे व्यवहार स्वच्छ व पारदर्शक असून ग्राहकांच्या मदतीसाठी ती तत्पर असल्याचे उद्गारही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काढले.

दहा हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट : किरण ठाकुर

 किरण ठाकूर यावेळी बोलताना म्हणाले की, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडने आजवर पाच हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा दहा हजार कोटी रुपयेपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी श्री. ठाकूर म्हणाले. ते म्हणाले की, लोकमान्य ही देशात वाढलेली सर्वात मोठी मल्टिपर्पज व मल्टिस्टेट शाखा आहे. सर्व संकटावर मात करून आम्ही वाटचाल करीत आहोत. आज लोकमान्यकडे 1500 लोक काम करीत आहेत त्यात 700 पिग्मी एजंट आदींचा समावेश आहे. या सोसायटीचा फायदा आज 50 हजार कुटुंबियांना झाला आहे.

शुभारंभ समृद्ध भविष्याचा या योजनेंतर्गत 28 महिन्यांच्या कायम ठेवीवर 20 हजाराच्या बदल्यात 25 हजार देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. ठाकुर यांनी जाहीर केले.

राज्यात कायमस्वरुपी म्युझियम उभारणार : किरण ठाकुर

राज्यात लोकमान्यतर्फे कायमस्वरुपी म्युझियम करण्याचा विचार यावेळी किरण ठाकुर यांनी बोलताना मांडला. जगातील करन्सी नोटचे, नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. शिवाय स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी श्री. ठाकुर यांनी दिली. त्यादृष्टीने जागा शोधण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकार चोर्ला घाटावरील रस्ता त्वरित दुरुस्त करणार : मुख्यमंत्री

चोर्ला मार्गावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून येणे-जाणे कठीण होऊन बसले आहे. तो रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी यावेळी  किरण ठाकुर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. पाहिजे तर टोल घ्या, असेही ते म्हणाले. यासाठी दुहेरी मार्ग झाला तर एक उत्कृष्ट मार्ग ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. श्री. ठाकुर म्हणाले की, यापूर्वी आपण तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना या रस्त्यासंबंधी म्हटले होते.  कर्नाटक सरकार याबाबत राजी नसल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.  रस्ता पूर्णपणे खराब झाला असून तो राज्य सरकारच्यावतीने लवकरात लवकर पूर्ण करू, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी आश्वासन दिले.

Related Stories

खोतीगाव सरकारी शाळा इमारतीचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे

omkar B

ईडीसीने अनेकांना स्वयंरोजगारसाठी आधार दिला

omkar B

ई-लिलावाच्या मालवाहतुकीतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना

omkar B

गटारे, नाल्यांतून उपसलेल्या मातीची उचलही मडगाव पालिकेकडून होईना

omkar B

डिचोली तालुक्मयात दोन तलाठी पॉझिटिव्ह

Patil_p

चार महिन्यानंतर पिसुर्ले सत्तरी नवदुर्गा देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले

Patil_p
error: Content is protected !!