तरुण भारत

परप्रांतीयांना लुटणारे तिघे जेरबंद

प्रतिनिधी/ सातारा

परप्रांतीयांना लुटणाऱया तीन जणांना सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. अक्षय सूर्यकांत पवार वय (वय 22 वर्ष रा. मस्करवाडी ता. जि. सातारा), दीपक भरत चव्हाण (वय 26 वर्षे रा. लावंघर ता. जि. सातारा), दत्तात्रय आबा शिंदे (वय 29 वर्षे रा. शिंदेवाडी ता. जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 15 ऑक्टोबर रोजी राधिकारोड, सातारा परिसरात अज्ञात चोरांनी दोन इसमांचे मोबाईल, गळ्यातील चैन व पैसे जबरदस्तीने काढुन घेवुन जबरी चोरी केली होती. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस स्टेशन व शाहुपुरी पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. रामनंद शिवनाथ साह (वय-22 वर्षे रा.करंजे पेठ सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हय़ाचा छडा लावण्याबाबत अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग सातारा श्रीमती आंचल व प्रभारी अधिकारी सपोनि ढेकळे यांनी सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दि. 17 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन इसमांना अंबवडे (ता. जि. सातारा) येथुन ताब्यात घेतले व एक इसमास वाढे फाटा सातारा येथुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दोन अज्ञात इसमांचे मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने मारहाण करुन काढुन घेतल्याचे मान्य केले. त्यांच्याकडुन एक मोबाईल फोन, चेन, व गुह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकुण 1 लाख 10 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग श्रीमती आंचल, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोउनि नानासाहेब कदम, पोउनि अनिल पाटील, मपोउनि श्रीमती भगत, पोहवा प्रशांत शेवाळे, पोना अविनाश चव्हाण, पोना. शिवाजी भिसे, ज्योतीराम पवार, पोशि गणेश भोंग, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, किशोर तारळकर यांनी गुन्हा घडल्यापासुन तत्काळ आरोपींचा शोध घेवुन आरोपींना ताब्यात घेवुन उघडकीस आणला.

Related Stories

शाहूपुरीचा कोरोनाला रोखण्यासाठी अनोखा फंडा

Patil_p

खाटांगळेत रेशन धान्य वाटपात भ्रष्टाचार

triratna

जिह्याला विकासनिधी खेचून आणणार

Patil_p

सांगली : रामलिंग बेट येथे नदीपात्रात बालिका बुडाली

triratna

सातारा : 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

triratna

सातारा : चारा छावण्यांची रखडलेली बिले तातडीने द्या – रणजितसिंह देशमुख

Shankar_P
error: Content is protected !!