तरुण भारत

दुर्गामातेचे राजधानीसह जिह्यात आगमन

शहरातील मानाच्या मंडळांनी नियम पाळून केली प्रतिष्ठापणा

प्रतिनिधी/ सातारा

दरवर्षी मोठय़ा उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा होत असतो. प्रत्येकाच्या चेहऱयावर एक वेगळा उत्साह असतो. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्याने एवढा उत्साह सातारा शहरात आणि जिह्यात दुर्गा उत्सवात दिसत नव्हता. सातारा शहरात 65 दुर्गा उत्सव मंडळांनी अगदी साधेपणाने दुर्गा मातेची प्रतिष्ठापणा केली. कोरोनाचे संकट टळू दे अशी विनंती दुर्गा भक्तांनी दुर्गा मातेकडे केली. सातारच्या मानाच्या दुर्गा माता मंडळांनी ही डामडौल न करता घट बसवले. नवरात्रीला सुरुवात केली.

सातारा जिह्यातील नवरात्रीला एक वेगळे महत्व असते. जिह्यातील प्रत्येक गावात नवरात्र उत्सव मोठय़ा उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. दुर्गा मातेची प्राण प्रतिष्ठा करण्यात मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ दंग झालेले असतात. देवी पुढे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्याने पोलिसांनी सक्त सूचना दिलेली आहे. त्यामुळे जिह्यात अगदी साधेपणाने दुर्गा उत्सवाला सुरुवात झाली आहे. जिह्यात सुमारे साडे तीनशे मंडळांनी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली.

सातारा शहरात 65 मंडळांनी अगदी साधेपणाने दुर्गा मातेचा उत्सव सुरू केला आहे. मानाच्या दुर्गा माता मंडळापैकी आईसाहेब या मंडळाने यावर्षी बसवली नाही. सम्राट मंडळाने एक फुटांची मूर्ती बसवली आहे. भारतमाता मंडळाने ही आज घट बसवले आहे. पंचपाळी दुर्गा माता ट्रस्टने कोणताही डामडौल न करता मंदिरात साधेपणाने सुरुवात केली आहे.

खाऊची पाने महागली

दुर्गेत्सवात खाऊच्या पानांना मोठी मागणी होते. पूजनाला खायची पाने लागतात. सातारा शहरात पाच ते दहा रुपयांना एक पान मिळत होते. पानांची टंचाई भेडसावत होती.

Related Stories

राज ठाकरेंनंतर आता सुप्रिया सुळे यांनी केली ‘ही’ मागणी

pradnya p

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 12,982 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

ना.शंभुराजेंनी दिला घरचा गणपतीला निरोप

Patil_p

सातारा : वाईचे आमदार मकरंद पाटील कोरोना बाधीत

triratna

सातारा जिल्ह्यात 602 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Shankar_P

सोलापूर : बार्शीत रामलल्ला भूमिपूजनचे जल्लोषात स्वागत

triratna
error: Content is protected !!