तरुण भारत

घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ

वार्ताहर/ कराड

   आदीशक्तीचा जागर असलेल्या नवरात्र उत्सवास शनिवार पासुन मोठया उत्साहात प्रारंभ झाला. सध्या कोरोना संकटामुळे सार्वजीक नवरात्र उत्सवावर मर्यादा आल्या असल्या तरी घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. दैत्य निवारणी मंदिराच्या बाहेर देवीच्या प्रतिमेचे पुजन करूण दर्शनाची सोय करण्यात आली आहे. महिलांसह अनेक पुरूषही नवरात्र उत्सवात उपवासाचे व्रत करतात. शनिवार पासुन या व्रतास सुरवात झाली त्यामुळे फळांच्या मागणीतही वाढ झाली आहे. सुदैवाने यावर्षी नवरात्र असुनही फळांचे दर वाढले नसल्याने उपवास करणाऱया भाविकांना दिलासा मिळाला आहे.

शनिवार पासुन नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला. कोरोना संकटामुळे सर्व मंदिरे बंद असल्याने ऐन नवरात्र उत्सवातही शहर व परीसरातील देवींची मंदिरे भक्तांविना ओस पडल्याचे आहे. त्या-त्या मंदिरांच्या पुजाऱयांकडुन देवींची विधिवत पुजाअर्चा कण्यात आली. एरव्ही कराडचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाई, दैतनिवारणी, उत्तरालक्ष्मी, सैदापुर येथील रेणुका, कार्वे येथील धानाई, राजमाची-सदाशिवगड येथील श्री जाणाई आदी मंदिरांत महिलां भविकांची मोठी गर्दी होत असते. शनिवारी मात्र महिलांनी घरीच पुजाअर्चा करून नवरात्रीच्या व्रतास प्रारंभ केला.

यावर्षी सर्वाजनिक नवरात्र उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. शनिवारी शहरासह ग्रामिण भागातील मंडळांनी मिरवणुका न काढता छोटया वाहनातुन देवीच्या मुर्ती प्रतिष्ठापनेसाठे नेल्या. सार्वजनिक ठिकाणी स्टेज आथव मंडप घालुन दुर्गादेवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यास बंदी आहे. तर पुजा अर्चा वगळता सर्व कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांष मंडळांनी परंपरा आखंड ठेवण्यासाठी दुकान गाळा अथवा घरात दुर्गामुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

 नवरात्र उत्सवात महिला व पुरूष भविकांकडुन नऊ दिवस उपवासाचे व्रत केले जाते. त्यामुळे फळांची आवकही वाढते परीणामी दर वर्षी नवरात्र उत्सवात फळांचे दर वाढतात. यावर्षी मात्र फळांच्या दरात वाढ झाली नसल्याने उपवासाचे व्रत करणाऱया भाविकांना दिलासा मिळाला आहे. सध्या बजारात सफरचंद 100 रूपये प्रति किलो, केळी 30 ते 40 रूपये डझन, मोसंबी 80 रूपये किलो, डाळींब 100 रूपये, पेरू 50 ते 60 रूपये, चिकु 50 ते 60 रूपये किलो दाराने विकली जात आहेत. फळांचे दर आवाक्यात असल्याने ग्राहकांकडुन फळांची खरेदी मोठयाप्रमाणात होताना दिसत आहे.

Related Stories

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा

pradnya p

कोरोना संकटात पवार धावले मदतीला

Shankar_P

गडहिंग्लजमधील बहीण-भाऊ पॉझिटिव्ह

triratna

साताऱयात रविवारी रंगणार वसंतोत्सव

Patil_p

कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांना सवलत

Patil_p

कोल्हापूर : बंद बंगला फोडून ७५ हजाराचा ऐवज लंपास

triratna
error: Content is protected !!